Ashok Chavan Will Give Review | काँग्रेस का हरली? अशोक चव्हाण देशभरातील निकालांचा आढावा घेतील

350
Ashok Chavan Will Give Review | Congress lost? Ashok Chavan will review the results across the country

मुंबई : देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन जाहीर केली आहे. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. या समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खा. ज्योती मणी हे चार सदस्य असतील.

देशात नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही समिती या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून पुढील 15 दिवसांत आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करेल.

अशोक चव्हाणांकडून आभार व्यक्त

या जबाबदारीबद्दल अशोक चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. या निवडणुकीच्या निकालाबाबत संबंधित राज्यांमधील काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण अहवाल सादर करू, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

पाच राज्यांमधील निवडणुकीचा निकाल काय?

1)  पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत देशाच्या लक्ष वेधून घेत सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसने विजयाची हॅटट्रिक नोंदविली. तथापि, २९२ सदस्यांच्या विधानसभेत नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा भूस्खलनाने पराभव केला.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला २९२ पैकी २१३ जागा, भाजपला 77, कॉंग्रेसच्या ०० आणि इतरांना ०१ जागा मिळाल्या आहेत. बंगालला बहुमतासाठी १४७ जागा हव्या आहेत. मात्र तृणमूल कॉंग्रेसने २०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत.

बंगालमधील पक्षीय बलाबल – 2021 (आघाडी) (West Bengal Election Final result 2021)

  • तृणमूल काँग्रेस -213
  • काँग्रेस -00
  • डावे – 01
  • भाजप – 77
  • एकूण – 292

आसाममध्ये भाजपने गड राखला (Assam Election Final result 2021)

आसाम विधानसभेच्या 126 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. आसाममध्ये भाजपला 60, काँग्रेसला 29, आसाम गण परिषद 9, एआययूडीएफ 16, बोडोलँड पीपल फ्रंट 04, युनायटेड पीपल्स पार्टी 06,  आणि अन्य 2 अशा जागांवर आघाडी मिळाली.

आसामधील पक्षीय बलाबल – 2021  

  • भाजप + – 75
  • काँग्रेस + – 50
  • अन्य – 1
  • एकूण – 126

तामिळनाडूमध्ये उलटफेर (Tamil Nadu Election Final result 2021) 

तामिळनाडू विधानसभेत  मोठा उलटफेर झाला आहे. सत्ताधारी AIDMK ला मोठा झटका बसला आहे. DMK ने एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केली. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक झाली. DMK ने यापैकी 133 जागांवर आघाडी मिळवली तर सत्ताधारी AIDMK ला 78 जागांवर आघाडी घेता आली. अन्य 1 असं चित्र तामिळनाडूत पाहायला मिळालं.

तामिळनाडूतील पक्षीय बलाबल 2021 

  • DMK –  133
  • AIDMK – 66
  • काँग्रेस – 18
  • भाजप – 4
  • अन्य – 13
  • एकूण – 234

केरळमध्ये डाव्यांनी गड राखला (Kerla Election Final result 2021)

केरळमध्ये सत्ताधारी LDF ने पुन्हा डाव मांडला आहे. एक्झिटपोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या LDF ने प्रत्यक्ष मतमोजणीतही आपला दबदबा कायम राखला.  140 जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी LDF ने 94, काँग्रेसने 39, भाजप 00 आणि अपक्ष-इतर 06 असं चित्र पाहायला मिळालं.

केरळमधील पक्षीय बलाबल 2021 

  • LDF – 94
  • काँग्रेस –  39
  • भाजप – 00
  • इतर – 07
  • एकूण – 140

पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक निकाल 

पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला झटका बसला आहे. 30 सदस्य संख्या असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत भाजपप्रणित एनडीएने सत्ता स्थापनेच्या दृष्टीने पावलं टाकली. पुद्दुचेरीमध्ये NDA ला 16, काँग्रेस  आणि मित्रपक्ष 08, इतर 6

पुद्दुचेरीमधील पक्षीय बलाबल 2021

  • NDA -16
  • काँग्रेस – 02
  • DMK – 06
  • इतर – 06
  • एकूण 30

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here