औवेसींचे वक्तव्य ‘भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह’ या वक्तव्याशी मिळते जुळते : मोहसिन रजा

52
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. त्याकरीता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे

लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. त्याकरीता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच AIMIM चे नेते असदुद्दीन औवेसीचे एक विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

यामध्ये औवेसी भाजप सरकार येऊ देऊ नका तसेच योगी अदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री बनन्यावर आव्हान देत आहेत.

असदुद्दीन औवेसीचे विधान

AIMIM चे नेते औवेसीने आपल्या भाषणात म्हटले आहे की, ”इंशाअल्लाह दोबारा योगी को उत्तर प्रदेश का मुख्यमंत्री नही बनने देंगे. हमारी कोशिश यही है, की  युपीमे भाजपा की सरकार न बने”.

भाजप नेत्यांनी औवेसीच्या या विधानावर निशाणा साधला आहे. औवेसीच्या या विधानानंतर मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले आहे की, औवेसी हैद्राबादवरून उत्तर प्रदेशात येऊन कोणाला मुख्यमंत्री बनवायचे हे कसे ठरवू लागले. त्यांनी कॉंग्रेसवर उपकार करावेत. युपीतील जनतेला माहितीये कोणाचे सरकार निवडावे ते.

नकवी सोबतच युपी सरकारचे मंत्री मोहसिन रजाने औवेसींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी औवेसींचे वाक्य ‘भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह’ या वक्तव्याशी मिळते जुळते असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, औवेसीच्या पुर्वजांनी कॉंग्रेसवर दबाव टाकून देशाचे विभाजन केले होते. अशा वृत्तींना युपीमध्ये थारा नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here