पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला राजकीय ‘रंग’ देण्याचा प्रयत्न

159

पुणे : पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षीय युवतीने रविवारी आत्महत्या केली होती.

या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

या प्रकरणाची पंकजा मुंढे, देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला ‘राजकीय’ वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना भेटून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांनी या प्रकरणातील सत्य समोर आणावे असे म्हटले आहे.

त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे, जर असे झाले तर पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापणार आहे.

23 वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती.

स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितले होते.

पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली.

त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवले.

त्यानंतर पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.

पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली.

चार दिवसांनंतर देखील या आत्महत्येचं गूढ कायम असल्यानं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केलीय.

पूजाने ज्या वानवडी भागात आत्महत्या केली त्या भागातील स्थानिक भाजप नेत्यांनी दोन दिवसांपूर्वीच पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर राज्य सरकारमधील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात घेतले जात असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा सोखमोक्ष लावण्याची गरज असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

पूजा चव्हाण आणि तिच्या मित्राचे जसे राज्य सरकार मधील मंत्र्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो आहेत तसेच भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबत देखील फोटो आहेत.

त्यामुळं या प्रकरणाचं गूढ आणखीनच वाढलंय. परंतु, पूजाच्या आई-वडिलांनी अजूनपर्यंत गप्प राहणेच पसंत केले आहे.

मात्र, या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची चिन्ह दिसू लागल्यानं पुणे पोलिसांनी स्वतः या प्रकणात दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here