अतुल भातखळकर यांचा सवाल : सेनेच्या गुलामांनी ५ वर्षात राजीनामे खिशातून बाहेर का काढले नाहीत?

144

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पाच वर्षे गुलामांसारखी वागणूक दिली जात होती. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या टीकेविरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पलटवार केला आहे.

भाजपाने गुलामांसारखी वागणूक दिली असेल तर तुम्ही मुकाट्याने का गुलामी सहन केली असा संतप्त सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.

असा सवाल अतुल भटखळकर टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले कि, विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या. त्यानंतर त्यांनी सत्तेसाठी भाजपचा विश्वासघात केला.

भातखळकर म्हणाले, की आता भाजपा सोडून कॉंग्रेसची गुलामी आवडीने करताय का? सेनेने स्वतःच्या इच्छेने गुलामी स्वीकारली आहे, आताही गुलामासारखे वागताय, आता काही बदल झाला आहे असा सवालही भटखळकर यांनी विचारला आहे.

बाळासाहेब ठाकरे गेले. त्यावेळी सोनिया गांधींनी त्यांना साधी श्रद्धांजलीचे ट्विट केलेले नाही. कॉंग्रेसबरोबर सत्तेत राहणे गुलामीपेक्षा वाईट आहे. शिवसेनेने हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

मुनगंटीवार यांच्याकडून खरपूस समाचार

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही राऊत यांच्या विधानाची दखल घेतली आहे. खरं तर, हा शब्द आपण केलेल्या अप्रामाणिकपणावर पांघरूण घालण्यासाठी वापरला जातोय.

लोकशाहीत राजा नसतो, गुलाम नसतो. गुलामांना आपला स्वाभिमान पुन्हा मिळवण्यासाठी 5 वर्षे लागली? जर त्यांच्याशी गुलामाप्रमाणे वागणूक दिली गेली तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे वारस सिंहासनासाठी गुलाम होतील का? मी ऐकले की अंगावर सरसरून काटा येत आहे.

हा शब्द कसा वापरला जातो हे आश्चर्यकारक आहे. मग ५ वर्षे खिशात राजीनामा का घेऊन फिरत होतात? त्या खिशात साखळी काय होती, साखळीतील मोठे कुलूप होते का? जर आपल्याशी गुलामाप्रमाणे वागणूक दिली गेली असेल तर आपण आपला राजीनामा एका सेकंदात तोंडावर फेकून द्यायाला हवा होता.

बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी इतकी कमकुवत असू शकते की, त्यांना गुलामीतून मुक्त होण्यासाठी 24 ऑक्टोबर 2019 च्या निकालाची वाट पाहावी लागली? आणि 24 ऑक्टोबर 2019 रोजी जेव्हा त्यांना समजले की भाजपा 105 जागांच्या वर जात नाही, तेव्हा त्यांना आठवले की आम्ही 5 वर्ष गुलामगिरीत होतो.

आता भाजपाच्या पिंजऱ्याचा दरवाजा खुला आहे आणि आता आपण राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात जाऊन बसू, अशी नवीन गुलामगिरीची व्याख्या आहे का? असे मुनगंटीवार म्हणाले.

राऊत काय म्हणाले?

शिवसेना नेते संजय राऊत जळगाव येथे आले होते. शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केले होते. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला आहे.

शिवसेना सत्तेत असतानाही खेडेगावातून शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न झाले. ते पाच वर्षे सत्तेत होते. पण सत्तेत असूनही तो गुलाम होतो. आपल्याशी गुलामासारखा वागणूक दिली जात असल्याचे राऊत म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here