अयोध्या : अनैतिक नात्यात कसले नीती नियम नसतात. त्यामुळे नात्याचे पावित्र्य राखले जात नाही.
एकदा वासना डोक्यात गेली की नाती गळून पडतात आणि एक असा गुन्हा घडतो, त्यात सर्वजण भरडले जातात.
अयोध्येत असाच अनैतिक संबंधांमुळे एक भयंकर गुन्हा घडला आहे.
काकूचे तिच्या पुतण्याशी प्रेमसंबंध होते. पण त्याच्या काकूला दुसर्या पुरुषाशी देखील प्रेमसंबंध ठेवायचे होते.
जेव्हा तिच्या प्रेमात पुतण्या अडसर ठरू लागला तेव्हा तिने पुतण्याचा काटा काढला.
प्रियकर आणि बहिणीच्या मदतीने काकूने आपल्या पुतण्याला ठेचून मारून टाकले. सुनील कुमार असे तिच्या पुतण्याचे नाव आहे.
अयोध्यामधील रुडौली गावात ही घटना घडली. काकू गीता यादव आणि तिचा पुतण्या सुनील यांचे प्रेमसंबंध होते.
सुनील आपल्या काकूच्या प्रेमात अक्षरशः वेडा झाला होता. पण काकु खूपच बाहेरख्याली होती. एकाच वेळी तिचे दुसर्या पुरुषाशी तिचे प्रेमसंबंध होते.
सुनीलला हे कळताच त्यांने वाद घालण्यास सुरवात केली. सुनीलचे ऐकून काकूंचा आपला बाहेरख्यालीपणा सोडायला तयार नव्हती.
तिच्या आयुष्यात दुसर्या पुरुषाच्या आगमनाने काकीला आता सुनीलमध्ये रस नव्हता, म्हणून काकूंनी त्याचा काटा थेट काढायचा निर्णय घेतला आणि पुतण्याची हत्या केली.
हे देखील वाचा :
- युपी धर्मांतर प्रकरणी तिघांना उचलले | नागपुरात दहशतवादविरोधी पथकाचे मोठी कारवाई !
- इमाम व मौलावीसाठी तालिबानी फतवा | 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुली व 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विधवांची यादी जारी करा !
- दिल्ली पोलिसात तक्रार दाखल | मुस्लीम महिला ऑनलाईन लिलावाच्या बळी !