Aurangabad Partial Lockdown | औरंगाबाद शहरात अंशतः लॉकडाऊन, काय चालू, काय बंद?

161

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात वाढत्या कोरोना बाधित रुग्णसंख्येमुळे 11 तारखेपासून अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. तर शनिवार आणि रविवार पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 

जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त, ग्रामीणच्या एसपी यांच्यामध्ये ही बैठक झाली. त्यानुसार हे निर्बंध 4 एप्रिलपर्यंत असणार असणार आहेत. शहरात लॉकडाऊन संदर्भात आज बैठक घेण्यात आली.

काय आहेत निर्बंध?

  • वैद्यकीय सेवा, फळ विक्रेते, गॅस उद्योग कारखाने, सुरू राहतील.
  • किराणा सुरू राहणार, मात्र मॉल बंद.
  • बुधवारपासून बाजार समिती बंद राहणार.
  • राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम, आंदोलन, स्विमिंग पूल, शाळा, महाविद्यालय बंद राहणार.
  • या कालावधीत लग्न समारंभ होणार नाहीत.
  • हॉटेल, बार रात्री 9 नंतर बंद राहणार. 9 पर्यंतही 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.
  • शनिवारी आणि रविवार शहरात पूर्ण लॉकडाऊन असेल.
  • ज्यांचं लग्न पूर्वीच ठरले आहेत, त्यांना रजिस्टर लग्न करण्याचा सल्ला.
  • 11 मार्चपासून ते 4 एप्रिल सगळी पर्यटनस्थळ बंद, वेरूळ, अजिंठा, बिबीचा मकबराही बंद.

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून जास्त कोरोनाबाधितांची नोंद

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काल सलग दुसऱ्या दिवशी राज्यात दहा हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

सरकार आणि स्थानिक प्रशासन सातत्याने राज्यातील जनतेला कोरोनाच्या नियमांचं सक्तीने पालन करण्याचं आवाहन करत आहे. तरीही नागरिक या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here