पोलिसांची टाळाटाळ | औरंगाबाद बलात्कार प्रकरणातील ‘मेहबुब’ कोण?

215

औरंगाबाद : औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात एक तरूणी तक्रार अर्ज घेऊन आली, एका व्यक्तीने ‘नौकरीचे अमिष’ दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दिलेली असते.

प्रकरण गंभीर असल्यामुळे पोलीस ही तात्काळ गुन्हा नोंदवून घेतात. आरोपीचे नाव असते मेहबुब इब्राहीम शेख (रा.शिरूर, बीड) गुन्हा दाखल होतो आणि खरा गोंधळ तिथूनच सुरू होतो.

कारण ‘महेबूब’ नावाचा एक ‘भाई’ राजकीय ‘युवानेता’ असते. सत्ताधारी पक्षाचे व राष्ट्रवादी युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षाचेही नाव हेच आहे. ‘मेहबुब इब्राहीम शेख, रा.शिरूर, बीड’ त्यामुळे पोलीस सावध आणि खडबडून जागे होतात.

गुन्हा दाखल होत नाही तोपर्यत हे नाव व त्याचे वलय पोलिसांच्या लक्षात आले नाही. आपण गुन्हा नोंदवला तो ‘हाय प्रोफाईल’ युवानेत्याचे आहे हे पोलिसांच्या ध्यानीमनी नव्हते.

पत्रकारांकडून विचारणा होऊ लागल्यावर पोलीस ‘सायलेंट मोडवर’ जाऊ लागतात. पोलीस अधिकारी ‘आऊट ऑफ रिच’ होऊ लागले. या प्रकरणातील ‘अधिक माहिती’ तपास पूर्ण होऊ द्या असे सांगत “डिटेल’ देण्यास नकार द्यायला सुरुवात करतात.

ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरी बाजू कातरु लागतात, तर तपास अधिकारी अश्लेषा पाटील अधिक माहिती देण्यासाठी तपास पूर्ण होऊ द्या असे सांगत ‘सेफ’ प्रतिक्रिया देतात.

‘मेहबुब शेख’ या नावाची व्यक्ती दुसरीच कोणी असल्याची ‘चर्चा’ सुरू होते. शहरातील सेंट्रल नाका परिसरात राहणारी एक तरूणी ‘कोचिंग क्लासेस’ घेऊन उदरनिर्वाह करते.

सदर तरुणीची दोन महिन्यांपूर्वी शिकवणीसाठी बीड रोडवर जागेचा शोध घेत असताना ‘मेहबुब’ इब्राहीम शेख (रा.शिरूर, बीड) याच्याशी झाली. तरुणी उच्चशिक्षीत असल्याने ‘महेबूब शेख’ याने तिला मुंबईत नोकरी मिळवून देण्याचे राजकीय ‘आश्वासन’ दिले.

१४ नोव्हेंबर रोजी रात्री आपण मुंबईला निघतोय असे सांगून तो तरुणीला कारमध्ये घेऊन जात असताना गाडी जालना रोडवरील एका बिअर बार समोर थांबवली जाते.

तिथून तो तरूणीला घेऊन जवळच्याच महाविद्यालयाच्या परिसरात जातो, आणि निर्जनस्थळी गाडी थांबवून गाडीच्या मागच्या सीटवरच तिच्यावर अत्याचार करतो.

या घटनेनंतर तरुणीला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला, तिने याबद्दल कोणालाही सांगितले नाही.
काही दिवसांनंतर तिने ही बाब आपल्या मावशीला सांगितली. मावशीने तिला आधार देत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर तरुणीने सिडको पोलीस ठाणे गाठत आरोपी मेहबुब इब्राहीम शेख (रा.शिरूर, बीड) याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी ‘आरोपी’ विरूद्ध गुन्हा दाखल केला.

पुढील तपास सुरु असल्याचे ‘बचावात्मक उत्तर’ सुरूवातीला सांगितले. त्यानंतर मात्र राष्ट्रवादी ‘युवक’ प्रदेशाध्याक्षाच नाव असल्याच नाव कळल्यानंतर पोलीस एकमेकांकडे बोट करून सारवासारव करीत असल्याचे दिसत आहे.

या ‘प्रकरणात’ पोलीसही ‘महेबूब’ कोण? हे सांगाण्यासाठी कमालीची ‘गुप्तता’ पाळत आहेत. यावरून हा ‘महेबूब’ कोण? याची उत्सुकता वाढली आहे. पोलिसांच्या लपवालपवीमुळे ‘महेबूब’ कोण? यापेक्षा अधिक सत्ताधारी युवानेता असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

पोलीसांची संदिग्ध व बचावात्मक भूमिका या प्रकरणातील ‘गुढ व रहस्य’ वाढवत आहे, पोलिसांना काही लपवायचे व कोणाला वाचवायचे आहे का? हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. ‘मेहबुब’ शेख यांनी खुलासा केला ‘तो मी नव्हेच’ तेव्हा हा ‘कोण’ आहे त्याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here