‘बँड बाजा पार्टी’ आम्हाला भाजपाची B टीम म्हणते | ओवैसींचा हल्लाबोल

197

मुंबई :  पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुका यंदा बहुरंगी होण्याची शक्यता आहे. 

एकेकाळी डाव्या पक्षांचा गड असलेल्या बंगालवर सध्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांची एकहाती सत्ता आहे. 

भारतीय जनता पक्षानं (BJP) बंगालची सत्ता ताब्यात घेण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच AIMIM पक्षानंही बंगाल विधानसभा निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे.

राज्यातील 100 जागांवर या पक्षाचा प्रभाव पडेल अशी शक्यता आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीत AIMIM पक्षामुळे होणाऱ्या मतविभागणीचा फायदा भाजपाला होईल असा  भाजपा विरोधकांचा आरोप आहे.

काँग्रेसनं तर AIMIM भाजपची B टीम असल्याची टीका केली आहे. AIMIM पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या विषयावर काँग्रेसला उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही सुनावलं आहे.

ओवैसींचा हल्लाबोल

आम्ही बंगाल विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतर ‘बँड बाजा पार्टी’ अशी ओळख असलेल्या काँग्रेसने आम्हाला भाजपची B टीम म्हणायला सुरुवात केली आहे.

ममता बॅनर्जी देखील हेच बोलत आहेत. मी फक्त एकटाच आहे का, ज्याबद्दल त्या हे बोलत आहेत?  मी अन्य कुणाचाही नाही तर जनतेचा आहे. ही गोष्ट त्यांनाही चांगली माहिती आहे, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.

बंगाल निवडणुकीत हिंसाचार नको

पश्चिम बंगालमधील निवडणुकांना हिंसाचाराचा मोठा इतिहास आहे. यावर्षी होणाऱ्या निवडणुका हिंसाचारमुक्त होतील याची खबरदारी घेण्याची आपल्याला संधी आहे, असं मत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांनी व्यक्त केलं आहे.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्तांना आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “आपल्याला 2021 मधील निवडणुका हिंसाचारमुक्त करण्याची संधी आहे.

2018 मधील (पंचायत) निवडणुकांसारखा यामध्ये हिंसाचार होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक आहे,’’ अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे.

देशाची राज्यघटना आणि लोकशाही संरक्षणासाठी सर्वांनी गांधीजींच्या तत्वाचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केले, सोबतच TMC व कॉंग्रेसवर तुफान हल्ला चढविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here