बांग्लादेशी नागरिक बनला भाजप पदाधिकारी | हा भाजपाचा संघ जिहाद आहे का? सचिन सावंत यांचा सवाल

139
बोगस कागदपत्रांच्या आधारे बांग्लादेशी नागरिक बनला भाजप पदाधिकारी

मुंबई: बांग्लादेशी नागरिक उत्तर मुंबई भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाचा अध्यक्ष म्हणून काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

सचिन सावंत यांनी एक व्हिडीओ ट्विट करत भाजपचा समाचार घेतला आहे. भाजपचा पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.  

भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले तर काहीजण पाकिस्तानी आयएसआयचे एजंट निघाले आहेत.

भाजपची प्रगती त्याच्याही पुढे झाली असून उत्तर मुंबई भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांग्लादेशी नागरिक रुबेल शेख निघाला. 

भाजपचा पदाधिकारी असलेला रुबेल शेख अवैध कागदपत्रांच्या आधारे भारतात राहत होता. शेख भाजपच्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली. त्याचं वय २४ वर्ष आहे, असं सावंत यांनी म्हटले आहे. हा भाजपचा संघ जिहाद आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजपत ‘संघजिहाद’ ही नवीन पद्धत सुरु झाली आहे का आणि सीएए कायद्यात भाजपसाठी काही वेगळी तरतूद केली आहे का? याचं उत्तर भाजपनं द्यायला हवं, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मुंबईमध्ये बेकायदेशीररित्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिक रुबेल शेखला पक्ष पदाधिकारी पदावर नियुक्ती केली जाते आणि दुसरीकडे सीएए कायद्याचा धाक दाखवला जात आहे.

भाजपाचे हे वागणे म्हणजे देश पातळीवर वेगळा न्याय आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय असे दिसते. भाजपात तर वाल्याचा वाल्मिकी होतो. ही नवीन पद्धती भाजपने सुरू केली आहे काय याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे असं सावंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here