Bank holidays in April | एप्रिलमध्ये बँंकाना सुट्ट्याचं सुट्या : तुमचे नियोजन वेळेत करा, अन्यथा आर्थिक गणित बिघडेल !

591
Bank holidays in April

मुंबई : एप्रिल महिन्याचे कॅलेंडर एकदा पाहून घ्या, तुमचे बँक शेड्युल तुम्हाला कळेल. कारण तब्बल निम्मा एप्रिल महिना बँकांचे कामकाज सुट्ट्यांमुळे बंद राहणार आहे.

त्यामुळे तुम्हाला बँकांची कामे उरकायची असतील तर रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर एप्रिल महिन्यात नऊ बँक हॉलिडे आहेत. त्याशिवाय दुसरा आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी बँका बंद राहणार आहेत.

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी बँका बंद राहणार आहेत. १ एप्रिल रोजी आर्थिक वर्ष हिशेब पूर्तीसाठी बँका बंद राहतील. तर २ एप्रिल रोजी गुड फ्रायडे असल्याने सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.

सोमवार ५ एप्रिल रोजी बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त हैद्राबाद क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बँकांना सुट्टी राहणार आहे.

६ एप्रिल रोजी मंगळवारी तामिळनाडूमधील विधानसभा निवडणूक मतदानाकरिता चेन्नई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बँकांना सुट्टी राहील. या दोन दिवशी देशात इतरत्र मात्र बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहील.

याच महिन्यात १३ एप्रिल रोजी गुढी पाडवा, तेलगू नववर्ष, उगाडी, बैसाखी निम्मित सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.

१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. १५ एप्रिल रोजी हिमाचल दिवस, बंगाली नववर्ष, बोहाग बिहू निम्मित बँक बंद राहतील. गुवाहाटी क्षेत्रात बोहाग बिहूनिमित्त १६ एप्रिल रोजी बँकांना सुट्टी असेल.

एप्रिल महिन्यात शेवटची सार्वजनिक सुट्टी ही २१ एप्रिल रोजी राम नवमी निम्मित बँकांना असेल. याच दिवशी गरिया पुजा निमित्त देखील सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.

याशिवाय १० एप्रिल रोजी दुसरा शनिवार, ११ एप्रिल रोजी रविवार तसेच २५ एप्रिल रोजी चौथा शनिवार आणि २६ एप्रिल रोजी रविवार बँका बंद राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here