लातूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सुंदर माझे कार्यालय या उपक्रमांतर्गत दिनांक 28 डिसेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत अनेक उल्लेखनीय कार्य करण्यात आलेले आहेत.
या उपक्रमात लातूर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांमध्ये कार्यालयीन अंतर्बाह्य स्वच्छता करण्यासाठी वेळापत्रक ठरवून देऊन स्वच्छता करवून घेतली गेली.
सर्व 361 कार्यासनाचे दप्तर सहा गठ्ठा (सिक्स बंडल) पद्धतीने ठेवले गेले असून; सामान्य प्रशासन विभागामध्ये एकुण 163 स्थायी आदेश संचिका अद्यावतीकरण करण्यात आले आहेत तर जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 50500 अभिलेख्याचे निर्लेखन वा नाशन केले गेले.
या निर्लेखन वा नाशन करण्यात आलेल्या अभिलेख्याचे वजन सुमारे 18.5 टन एवढे होते तर या निर्लेखनातूनच 166683/- रु एवढे उत्पन्न जिल्हा परिषदेला मिळाले आहे. जिल्हा परिषद मधील 54 संवर्गाच्या सेवा जेष्ठता यादया प्रसिद्ध करण्यात आले असून 8658 पैकी 8625 कर्मचाऱ्यांच्या प्रथम व दुय्यम सेवा पुस्तिका अद्यावत करण्यात आलेले आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 1, 2 व 3 रा आश्वासित प्रगती योजना प्रगती योजनेच्या पात्र असलेल्या 256 कर्मचा-यांना लाभ देण्यात आलेला आहे.
तसेच सर्व संवर्गातील पदोन्नतीच्या माहे ऑगस्ट 2021 अखेर रिक्त पदावर निवड केली असून 8658 अधिकारी-कर्मचा-यांपैकी 8269 अधिकारी -कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करण्यात आले आहेत तसेच जिल्हा परिषद अंतर्गत अभिलेख जतन करून ठेवण्यासाठी निरुपयोगी लोखंडी पाईप चे 50 रॅक तयार करण्यात आलेले आहेत.
सुदंर माझे कार्यालय हा उपक्रम लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपाध्यक्ष व सर्व विषय सभापती यांनी यशस्वीपणे राबविला. या विविध उल्लेखनीय कार्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांनी सांगितले.