भंडारा दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

178

पुणे : येथे आज पहाटे दोन वाजता घडलेल्या दुर्घटनेत दहा बालके दगावल्याने अतिशय वेदना होत आहेत, ही घटना कशामुळे घडली याची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिलेल आहेत. 

भंडाऱ्या सारख्या दुर्दैवी या घटना पुढे घडू नये यासाठी राज्यातील हॉस्टिपटलमध्ये जिथे नवजात बालकांना ठेवले जाते. त्या कक्षांचेही ऑडिट करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (पीएसआय) वार्षिक सभेनंतर ते शनिवारी (दि.9) पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पुण्याला सभेसाठी येणार होते.

त्यांना मी भंडारा येथे पाठविले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी मी चर्चा केली असून घटना कळाल्यापासून ते प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

संबंधितांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तिथे सतत २४ तास ऑनड्युटी कोणीतरी थांबायला हवे होते.

रात्री कोणाची ड्युटी होती, कोणाची जबाबदारी होती हे तपासले जाईल. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला कडक शासन केले जाईल. त्यामध्ये कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा घटनेठिकाणी अग्निशमन यंत्रणा नव्हती. आठ दिवसांपूर्वी रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणल्याचे वक्तव्य केल्याबदल छेडले असता ते म्हणाले की, घडलेली घटना दुदैवी आहे.

कोणी काय वक्तव्य करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ऑडिट अहवाल आल्याशिवाय त्या गोष्टी कशामुळे घडल्या याबद्दल बोलणं योग्य ठरणार नाही. जे कोणी वक्तव्य करीत आहे, त्या गोष्टींमध्ये तथ्यही तपासणीवेळी पाहिले जाईल.

विद्यार्थ्यांकडून लाखांमध्ये शैक्षणिक फी घेतली जात असल्याबद्दल काही शाळांबद्दल तक्रारी येतात. अशावेळी पालक आणि शाळांचे म्हणणे ऐकून आपण निर्णय देतो.

दरम्यान, कोरोनाचे संकटात टप्याटप्याने आपण काही नियम शिथील केले. सर्वांनी शंभर टक्के मास्कचा वापर करुन खबरदारी घ्यायला ह़वी. राज्यात कोरोनामुक्त स्थिती वाढली पाहिजे, असेही एका प्रश्नांच्या उत्तरात ते म्हणाले.

मी चर्चा केलेली नाही : पवार 

सोलापूरचे शिवसेना नेते महेश कोठे राष्ट्रवादीत आले आहेत काय याबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, महेश कोठे हे सहा-आठ महिने अस्वस्थ आहेत.

राजकीय काहीतरी भुमिका घ्यावी असे त्यांचे चालले होते. महाविकास आघाडीच्या तीन पक्षाच्या सरकारमध्ये एकमेकांच्या पक्षाची फोडाफोडी करायची नाही, असे ठरले आहे.

काही बंधने आम्ही पाळत आहोत. महेश कोठे यांच्याबरोबर मी चर्चा केलेली नाही. त्यामुळे याबद्दल मला अधिक माहिती देता येणार नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here