मुंबई : भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली?
अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत.
जगताप यांनी सांगितले की, अर्णब गोस्वामी हे मुंबई पोलिसांपासून वाचण्यासाठी दिल्लीमध्ये बस्तान हलविले आहे. जर मुंबईच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला तर मुंबई पोलिसांवर त्यांना दिल्लीतून अटक करून आणण्यासाठी दबाव वाढेल.
तसेच अर्णब यांच्या अटकेची मागणी करणार आहेत. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली आहे.
सोमवारपासून गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. मी आणि कार्याध्यक्ष चरणजीत सिंह सप्रा सोमवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहोत.
सरकारी, निमसरकारी, रेल्वे, बँकिंग, पोलीस व सैन्य दलातील नोकरीचे अपडेट मिळविण्यासाठी क्लिक करा : jobxplor.com