Big News Sanjay Raut | संजय राऊत यांच्यावर उद्या पुन्हा अँजिओप्लास्टी होणार?

166

संजय राऊत यांच्यावर सुरूवातीला अँजिओग्राफी केली जाईल आणि त्यानंतर उद्या दुपारी अँजिओप्लास्टी केली जाईल.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आज हृदयावरील उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. उद्या दुपारनंतर संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार आहे.

एक वर्षापूर्वी लिलावती रूग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. परंतु त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.

लिलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ मॅथ्यू राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करणार आहेत. आज सायंकाळी संजय राऊत लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत.

त्यांच्यावर सुरूवातीला अँजिओग्राफी केली जाईल आणि त्यानंतर उद्या दुपारी अँजिओप्लास्टी केली जाईल. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दक्षिण भारतामधील फिल्म इंडस्ट्री देखील फार मोठी आहे. पश्चिम बंगाल व पंजाबामध्येही फिल्मसिटी आहेत.

योगीजी, त्या ठिकाणी जाऊन दिग्दर्शक, कलाकारांशी चर्चा करतील का? का मुंबईतच ते असं करणार आहेत?” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here