कोल्हापूर : केंद्राच्या कृषी कायद्याचं समर्थन करणाऱ्या भाजपनं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारावं. म्हणजे शेतकरी पायातील हातात घेऊन सांगतील हा कायदा शेतकऱ्यांच्या बाजूचा आहे की विरोधातला आहे, अशी टीका कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.
उद्या होणाऱ्या भारत बंदमध्ये सर्व नागरिकांनी शांततेनं सहभागी व्हावं. आपल्या घरावर केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काळा झेंडा लावावा.
आपला या आंदोलनाशी काहीही संबंध नाही अशी भावना मनामध्ये न आणता सगळ्यांनी यात सहभागी व्हावं. चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरुन भाजपची शेतकऱ्यांबद्दल असलेलं प्रेम दिसून आलं.
त्याचबरोबर शेतकऱ्याच्या तरुण मुलांनी मोबाईचा डीपी काळा लावून शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहावं असं आवाहन या वेळी सतेज पाटील यांनी केलं.
खासगी कंपनीच्या कृषी क्षेत्रातील प्रवेशावरुन शरद पवारांच्या पत्रावर टीका केली जातेय, मात्र शरद पवार यांनी खासगी कंपनींला आंदण देण्याचं लिहिलं नाही ना? असं म्हणतं पवार यांच्या पत्रावरुन जे आरोप केले जातात त्याला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी अधिकृत भूमिका मांडली आहे.यामधून शेतकरी उद्ध्वस्त करण्याची भूमिका दिसतेय अशीही टीका सतेज पाटील यांनी केलीय.
चंद्रकांत पाटील काय पंतप्रधान लागून गेलेत का?
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणतात हा कायदा बदलणं शक्य नाही.
हे काय पंतप्रधान लागून गेलेत का केंद्राचे कृषी मंत्री लागलेत असा सवाल यावेळी हसन मुश्रीफ यांनी केलाय. माजी मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही केलेल्या कायद्यामुळं महाराष्ट्रात आंदोलन होत नाही.
पण महाराष्ट्रात उसाचं पिक जास्त आहे. एफआरपीचा कायदा शरद पवार यांनी केला असल्याची आठवण यावेळी मुश्रीफ यांनी करुन दिली.