भाजपला जबरदस्त हादरा | एकीच्या बळाचा महाविकास आघाडीला फायदा

168

विदर्भात नेहमी भाजप विरुद्ध काँग्रेस लढाई होते. गेल्या काही वर्षात विदर्भात काँग्रेसचे नुकसान झाले.

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांच्या निकालात महाविकास आघाडीने सरशी केली आहे.

नागपूर पदवीधर विधानपरीषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे.

तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत.

काँग्रेसने भाजपाला धक्का दिला 

काँग्रेस एकत्र आली आणि गटातटाचे राजकारण बाजूला ठेवले तर काय होऊ शकतं याचे उदाहरण म्हणजे नागपूर पदवीधर निवडणूक. नागपूर पदवीधर म्हणजे भाजपचा गड वर्षानुवर्षे ही जागा भाजपचा पारंपारिक गड राहिला.

नितीन गडकरी यांचा तो मतदारसंघ. त्यात यावेळी उमेदवारी मिळाली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू संदीप जोशी यांना अभिजित वंजारी पराभूत केले.

काँग्रेसने तरुण आणि गेली दीड वर्ष या मतदारसंघात यांनी मेहनत घेतली असे अभिजित वंजारी यांना संधी दिली. काँग्रेसममध्ये उमेदवारी देण्यावरून ही नाराजी नाट्य होतं पण तसं न होता अभिजित वंजारी यांना काँग्रेसने ताकद दिली.

अभिजित वंजारी मेहनत करत होते पण विदर्भातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पण भूमिका बजावली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विदर्भातील सर्व काँग्रेस नेत्यांना एकत्र करून जबाबदारी दिली.

ऊर्जामंत्री नितीन राऊत नागपूर शहर नागपूर ग्रामीण आणि वर्ध्याची जबाबदारी घेतली सुनील केदार यांनी. चंद्रपूर सांभाळलं विजय वडेट्टीवार यांनी.

त्यांना साथ मिळाली राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख आणि प्रफुल पटेल, खासदार बाळू धानोरकर यांची. पुण्यासाठी देखील काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन इतिहास रचला. संपर्कमंत्री असलेल्या विश्वजित कदम यांच्यावर विशेष जबाबदारी होती.

पुण्यात देखील बाळासाहेब थोरांताच्या नेतृत्वात संपर्कमंत्री असलेल्या विश्वजित कदम तसेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपली जबाबदारी पार पाडत विजय मिळवण्यात मोलाचा वाटा उचलला.

काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या जिल्ह्यात प्रचार आणि मतदानाची जबाबदारी बजावली आणि इतिहास घडला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर भाजपला पहिला तडाखा दिला तो नागपूर पदवीधरमध्ये.

विदर्भात नेहमी भाजप विरुद्ध काँग्रेस लढाई होते. गेल्या काही वर्षात विदर्भात काँग्रेसचे नुकसान झाले. पण नागपूर पदवीधर निवडणुकीने किमान काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे.

पक्ष एकत्र येऊन काम केलं तर …

नागपूर जिल्हापरिषद आणि पाठोपाठ पदवीधर निवडणुकीत भाजपला धूळ चारत काँग्रेसने दाखवली एकीची ताकद दाखवली. राज्यात काँग्रेस आज चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे.

पुणे शिक्षक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूर म्हणजे विदर्भात विधान परिषदेत काँग्रेसला यश मिळाल्याने संघटनेला नक्कीच इथे बळ मिळेल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता काँग्रेसचा कस लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here