भाजपाचे आ.अभिमन्यू पवार यांनी औसा ग्रामविकास पॅटर्न राबवत अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी आपल्या संकल्पनेतून राबवलेला औसा ग्रामविकास पॅटर्न आता राज्यभर राबवण्यात येणार आहे.
त्यांच्या या पॅटर्नमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आणि ग्रामीण भागात मोठ्या सुधारणा घडणार आहेत. असा विश्वास भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला.
आ.अभिमन्यू पवार यांनी मनरेगा अंतर्गत कुशल कामांचे पॅकेजिंग करत औसा पॅटर्नच्या अंमलबजावणीसाठी अनेक गावांना भेटी दिल्या. अनेक शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
लातूरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा परिपत्रक काढून औसा पॅटर्नला मानुरी दिली. त्यामुळे आता विविध स्तरातून आ.अभिमन्यू पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.