शहापूर तालुक्यात 4 दिवसांपासून बेपत्ता झालेल्या 2 अल्पवयीन मुलींचे मृतदेह सापडले | हत्या की आत्महत्या? चर्चेला उधाण !

348
Shocking! Accused of murdering his girlfriend and remarrying killed Sarafa to give jewelery to his second wife!

पालघर: शहापूर तालुक्यातील उंबरमाळी गावातल्या चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या दोन तरूणींचे मृतदेह पेठ्याचपाडा येथून सापडले. 

मध्य रेल्वेच्या उंबरमाळी स्टेशन परिसरात ही घटना घडली. 14 ते 16 वर्षाच्या मुली 500 मीटरच्या अंतरावर मृत आढळल्या. पोलिस तपास करत आहेत ही हत्या आहे.

4 दिवसांपासून बेपत्ता

उंबरमाली गावातून 3 किमी अंतरावर असलेल्या पेठ्यापापाडा आदिवासी भागात आपल्या कुटुंबासमवेत राहत असलेल्या या मुली मंगळवारी घराबाहेर गेल्या होत्या. त्या घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी सर्वत्र शोध सुरू केला.

त्यांनी आजूबाजूचा परिसर, मित्र आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली. 4 दिवस शोध घेत असताना चौथ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास उंबरमली गावात वाहणार्‍या पाण्याच्या नाल्याजवळ बेपत्ता झालेल्या दोन तरूणींपैकी एकीचा मृतदेह आढळला.

घटनेची माहिती मिळताच कसारा पोलिस प्रभारी प्रभारी केशवराव नाईक आणि सलमान खतीब यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी पोलिस पाटील यांया मदतीने आणखी एका हरवलेल्या मुलीचा शोध सुरू केला.

सहा तासांत आणखी एक मृतदेह सापडला

हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच पोलिसांसह नागरिकांनीही शोध सुरु केला. त्याच दिवशी पेठचापाडा येथील दुसऱ्या तरूणीचा मृतदेह सापडला. एकाच दिवशी दोन तरुणींच्या मृत्यूमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पोलिस तपास सुरू

शहापूरचे उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक केशवराव नाईक, उपनिरीक्षक सलमान खतीब व अन्य पोलिस कर्मचारी या प्रकरणाच्या तपासाकडे वळले आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here