समाजामध्ये लव जिहादच्या घटना वारंवार विविध माध्यमातून समोर येत असतात.
प्रत्येक घटनेचा हेतू एकच असला तरी पद्धत मात्र नवीन असते.समाजात लग्नासाठी मुलीचे प्रमाण कमी असताना एक बनावट पोलीस अधिकारी मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होता.
आधी त्यांच्याशी हिंदू असल्याचे सांगून प्रेम संबंध वाढवायचा आणि त्यांच्याशी लग्न करायचा आणि महत्त्वाचे म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलींना धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडत होता.
अबिद असे त्याचे खरे नाव असून तो उत्तर प्रदेशातील आहे. अबिद नावाचा हा व्यक्ती अगोदरच लग्न झालेला पाच मुलांचा बाप आहे. मात्र तरीही तो तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करीत होता.
आबिद हा स्वतःला गुन्हे शाखेचा इन्स्पेक्टर आदित्य सिंग असल्याचे सांगायचा जेणेकरून हिंदू मुलींना जाळ्यात ओढता यावे. एकदा मुलगी जाळ्यात आली की मोठमोठी स्वप्नं दाखवत लग्नासाठी त्यांना राजी करायचा. एकदा लग्न झाले की त्यामुलींवर दबाव टाकून धर्म परिवर्तन घडवून आणायचा.
उत्तर प्रदेशमधील आजमगड येथील हा प्रकार असून पोलिसांनी इंदिरानगर सेक्टर 9 भागामध्ये त्याला पकडले आणि अटक केली. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर हा भांडाफोड झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन लग्न केल्यानंतर त्याने तिसरे लग्न दुसऱ्या धर्मातील एका मुलीबरोबर फेब्रुवारी महिन्यात केले. तो तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवत असल्याने तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला होता.
लग्न झाल्यावर मात्र त्याने आपले खरे रूप सांगत आपला अगोदर देखील विवाह झाला असल्याचे तिला सांगून तिच्याशी लग्न केले. निकाह झाल्यानंतर धर्म परिवर्तन करून या तरुणीचे नाव त्यानं आयशा असे ठेवले होते.
दुसरे लग्न झाल्यानंतरही सर्व काही ठीक सुरू होते. मात्र त्यांच्यातील सुप्त इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. फेब्रुवारी महिन्यात त्यानं मध्यप्रदेशमधील आणखी एका मुलीसोबत आपण हिंदू असल्याचे सांगून लग्न केले.
त्यावेळी मात्र दुसऱ्या पत्नीने त्याच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक, लव्ह जिहाद इत्यादी कारणांवरून तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी आबिदला अटक केली असून त्याची तपासणी सुरू आहे.
त्याच्याकडं आदित्य सिंह नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचे आयडेंटिटी कार्ड सापडले आहे. त्याने या कार्डचा वापर करून फक्त मुलींना गंडवले आहे की, अजून काही गुन्हे केले आहेत याचा पोलीस तपास करीत आहेत.
या प्रकरणाने लव जिहाद सारखा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. आयुष्यभराचा प्रश्न असल्याने तरुणींनी मैत्री करताना काळजी घ्यावी, एक चूक आयुष्य उध्वस्त करू शकते. काहीही संशयास्पद वाटले तर पोलिसांकडे संपर्क साधावा, एखाद्याच्या तावडीत सापडून आयुष्य बरबाद करून घेऊ नये, असे आवाहन हिंदू वहिनीने केले आहे.