मुंबईः बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी 15 वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले आहे. शनिवारी, 3 जुलै रोजी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला.
या संयुक्तरित्या एकत्रितपणे घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर किरण आणि आमिर तुफान चर्चेत आले आहेत. आमिर-किरण जोडी बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक होती.
आमिर आणि किरणचे वेगळे होणे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी औपचारिक निवेदनात म्हटले आहे की, विभक्त होण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला
औपचारिक विधान
’15 वर्षांच्या या सुंदर प्रवासात आम्ही एकत्र अनेक अनुभाव एकमेकांसोबत शेअर केले. आयुष्यातला आनंद वाटून घेतला. आमचं नातं विश्वास, प्रेम आणि सन्मानामुळे टिकून राहीला. पण आता आम्ही जीवनातील एका नव्या अध्यायाची सुरूवात करत आहोत. अनेक दिवसांपूर्वीचं आम्ही विभक्त झालो आहोत. पण आता आधिकृत घोषणा करत आहोत.’
आमिर आणि किरण कधी भेटले?
१९८६ मध्ये आमिरने रीना दत्ताशी लग्न केले होते. किरणला भेटल्यावर आमिरही रीनाबरोबर होता. आमिरने मुलाखतीत सांगितले होते की, रीनाशी घटस्फोट झाल्यानंतर त्याचे आणि किरणचे अफेअर सुरू झाले.
आमिर आणि किरणचे 28 डिसेंबर 2005 रोजी लग्न झाले होते. त्यांचा मुलगा आझादचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून 2011 मध्ये झाला होता.
हे देखील वाचा
- मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून फक्त एकाला संधी मिळणार? कोणाची संधी हुकणार?
- विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असल्याने पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे अध्यक्ष होतील? संजय राऊतांचे भाकीत
- विद्यार्थिनीचे आपल्या शिक्षकावरच प्रेम जडले; तिने थेट त्याच्यासाठी घरदार सोडले