Bollywood News | अंकिता लोखंडे पुन्हा एकादा सोशल मीडियावर चर्चेत

178

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पुन्हा एकादा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

ती नेहमी आपले फोटो आणि व्डिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असते. असेच सध्या तिने आपल्या इंन्स्टाग्राम अकांउटवर एक धमाकेदार व्डिडिओने धुमाकूळ घातला आहे. 

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ने अभिनेता अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘हर किसी को’ या गाण्यावर डान्स केला आहे.

या व्डिडिओमध्ये अंकिता पिवळ्या रंगाचा वन पीसमध्ये दिसली आहे. यासोबत अंकिताने सुंदर अशी ‘२०२१ येथे आहे’  कॅप्शनदेखील दिली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे.

याशिवाय या धमाकेदार व्हिडिओला फॅन्स आणि बॉलिवूड स्टार्संनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओला एका चाहत्याने तर ‘Oh My God’ अशी कॅप्शन दिली आहे.

बिग बॉसची स्पर्धक आणि अभिनेत्री दलजित कौर हिने कॅप्शनमध्ये ‘उफ्फ…’ असे लिहिले आहे. यामुळे हा व्डिडिओतून अंकिताने चाहत्यांना भूरळ घालत आहे.

(video : lokhandeankita instagram वरून साभार)

अंकिता लोखंडेने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेत अंकिता आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मुख्य भूमिका होत्या.

याशिवाय अंकिताने कंगना राणावतच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अंकिताने ‘बागी 3’ या चित्रपटात ही काम केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here