Bollywood News | अर्जुन कपूर-मलायका अरोरा यांचा खुल्लमखुल्ला रोमान्स कॅमेऱ्यात कैद झाले !

227

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या बोल्ड फोटोंसोबत आपल्या लव लाइफमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर सोबत ती स्पॉट झाली होती.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर धर्मशालामध्ये फिरायला गेले होते. या ट्रीपवर करीना कपूर, तैमूर आणि सैफ अली खानदेखील होते.

या ट्रीपचे कित्येक फोटो मलायकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. ही ट्रीप मलायकाने खूप एन्जॉय केली. मात्र तिने एकही फोटो बॉयफ्रेंड अर्जुनसोबत टाकला नाही.

आता धर्मशाला ट्रिपवरून परतल्यानंंतर तिने अर्जुन कपूरसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होतो आहे.

या फोटोत मलायकाने अर्जुन कपूरच्या खांद्यावर डोके ठेवले आहे. तर अर्जुननेही तिला प्रेमाने पकडले आहे. या फोटोला आतापर्यंत ५ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. मलायकाने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, जेव्हा तू सोबत असतो तेव्हा कोणताच क्षण उदासीन नसतो.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा २०१७ साली घटस्फोट झाला होता. मात्र मलायका २०१६पासून वेगळी रहायला लागली होती. दोघांना एक मुलगा आहे अरहान खान ज्याची कस्टडी मलायकाला मिळाली आहे.

दोघेही वेगळे झाल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांच्यातील जवळीक वाढू लागल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली होती.

एका चॅनेलने एका मुलाखतीत अर्जुनने मलायकासोबत लग्नाच्या चर्चांवर सांगितले होते की, मला माहित आहे आणि संपूर्ण कुटुंबाला माहित आहे. मी मॅच्युअर आहे जे करेन ते योग्य करेन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here