Bollywood News | ‘डार्लिंग’चा ‘भन्नाट’ ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

225
nikkhhil-chavaan-ritika-shrotri-prathamesh-parab-darling-movie (1)

चिनार-महेश या आजच्या काळातील आघाडीच्या संगीतकार जोडीनं चित्रपटातील गीते संगीतबद्ध केली आहेत.

अनलॉक सुरू झाल्यापासून मराठी सिनेसृष्टीत एकाच सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘डार्लिंग’ या आगामी मराठी सिनेमाच्या निर्मात्यांनी २६ जानेवारी २०२१ रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

सिनेमासृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. ‘‘डार्लिंग तू…’’ आणि ‘‘ये है प्यार…’’ या दोन्ही गाण्यांनंतर आता सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

७ हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत ‘डार्लिंग’ची निर्मिती अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांनी केली आहे.

समीर आशा पाटील यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्री ही ‘टकाटक’ जोडी पुन्हा एकदा या सिनेमात लक्ष वेधून घेणार आहे.

त्यांच्या जोडीला ‘लागिरं झालं जी’फेम निखिल चव्हाणही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. एका वेगळ्याच वाटेवरील तसंच आजवर कधीही समोर न आलेले विविध पैलू उलगडणारी प्रेमकथा या सिनेमात आहे.

नवीन वर्षाची दमदार सुरूवात करण्याच्या उद्देशानं ‘डार्लिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लॉकडाऊनमुळे या वर्षात आलेली मरगळ झटकणार आहे.

नव्या वर्षात नव्या उमेदीनं भरारी घेण्याचं टॉनिक ही मराठमोळी ‘डार्लिंग’ सर्वांना देईल अशी खात्री सिनेमाच्या निर्मात्यांना वाटते.

‘डार्लिंग’चं लेखन समीर आशा पाटील यांनी केलं असून या सिनेमात प्रथमेश परब, रितीका श्रोत्री, निखिल चव्हाण, मंगेश कदम, आनंद इंगळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here