रेखा
या लिस्टमध्ये सगळ्यात आधी नाव येतं बॉलिवूडच्या सगळ्यात सुंदर अभिनेत्रीचं रेखाचं. ती आजही तिच्या अदाकारीने लोकांना वेड लावते.
रेखाच्या चित्रपटादरम्यान लोकं तिच्यावर जितके प्रेम करायचे तितकेच प्रेम ते आजही तिच्यावर करतात. आजही तिच्या स्टाईलमध्ये आणि सुंदरतेमध्ये काहीच बदल झालेला नाही. तिला संपूर्ण जग रेखा या नावाने ओळखत असलं तरी तिचं खरं नाव ‘भानुरेखा गणेशन’ आहे.
शिल्पा शेट्टी
बॉलिवूडची ‘धडकन’गर्ल म्हणजेच शिल्पा शेट्टी ही आपल्या सुंदरतेसाठी आणि फिटनेससाठी ओळखली जाते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी तिने तिचे पूर्वीचे नाव ‘अश्विनी शेट्टी’ बदलले होते. अश्विनीची शिल्पा शेट्टी झाल्यानंतर तिने चांगलीच लोकप्रियता कमावली.
कियारा आडवानी
बॉलिवूडची अभिनेत्री कियारा आडवानी चे खरे नाव ऐकूण तुम्ही चकित व्हाल. आपल्या हॉट आणि स्टाईश फोटोसाठी सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या कियारा आडवानीचे खरे नाव आलिया आडवानी होते. परंतु चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सल्मान खानने तिला नाव बदलण्यासाठी सुचविले होते.
प्रीती जिंटा
बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती जिंटाने आपल्या चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरूवात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांत अभिनय करत केली होती. तीने बॉलिवूडमधल्या अनेक लोकप्रिय चित्रपटांत काम केले. त्यानंतर तिने तिच्या विदेशी प्रियकर गुडइनफ सोबत गपचूप लग्न केले. प्रीती जिंटाचे खरे नाव प्रीतम सिंह होते. ते बदलून तिने स्वत:च तिचे नाव प्रीती जिंटा केले.
श्रीदेवी
साऊथ आणि बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवींचे नाव आजही लोकांच्या ओठावर आहे. आज त्या या जगात नसल्या तरी काही खास क्षणांत त्यांच्या फॅन्सना त्यांची आठवन येते. श्रीदेवीसारखी अदाकारी कोणाचीच नसते कारण ती काळाला आपलसं करते. आणि दिवसेंदिवस लक्षात राहते. श्रीदेवींचे खरे नाव ‘यम्मा यंगर’ होते.
महिमा चौधरी
1997 मध्ये ‘परदेस’ चित्रपटात आलेल्या महिमा चौधरी यांना हे नाव चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यांनी दिले होते, ज्यांना शोमन म्हणूनही ओळखले जाते. तसे, महिमाचे खरे नाव रितु चौधरी आहे. तिचा जन्म बंगालच्या दार्जिलिंगमध्ये झाला होता.