अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस अदांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.
मलायकाचे स्टायलिश फोटो व व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोत मलायका उन्हात बसलेली दिसते आहे. नेहमीप्रमाणे या फोटोत मलायका खूप स्टायलिश दिसते आहे आणि कॅमेराकडे पोज देताना दिसत आहे.
मात्र यात मलायका नो मेकअप लूकमध्ये पहायला मिळते आहे. तिने हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. फोटोत मलायका अरोराने व्हाइट कलरच्या स्ट्राइपचा टॉप परिधान केला आहे.
तिचा हा ‘लूक’ पाहून चाहते खूप कौतूक करत आहेत. ही पहिली वेळ नाही आहे जेव्हा मलायका अरोरा फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. मलायकाचा फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.
मलायका अरोरा बऱ्याचदा अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत येत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा २०१७ साली घटस्फोट झाला होता. मात्र मलायका २०१६पासून वेगळी रहायला लागली होती. दोघांना एक मुलगा आहे अरहान खान ज्याची कस्टडी मलायकाला मिळाली आहे.
दोघेही वेगळे झाल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांच्यातील जवळीक वाढू लागल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली होती.
एका चॅनेलने एका मुलाखतीत अर्जुनने मलायकासोबत लग्नाच्या चर्चांवर सांगितले होते की, मला माहित आहे आणि संपूर्ण कुटुंबाला माहित आहे. मी मॅच्युअर आहे जे करेन ते योग्य करेन.