अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि पॉप स्टार निक जोनस बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. हे जोडपं बऱ्याचदा आपल्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत येते. विशेष म्हणजे दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते.
निक जोनस प्रियंका चोप्रा आगामी हॉलिवूड रोमँटिक ड्रामा टेक्स्ट फॉर यूमध्ये केमिओ करताना दिसणार आहे. डेलीमेल डॉट को डॉट युकेच्या रिपोर्टनुसार, निकला प्रियंकासोबत लंडनमध्ये एका कॅबमध्ये चित्रपटाचे शूटिंग करताना पाहिले. त्यानंतर हे वृत्त वाऱ्यासारखे सगळीकडे पसरले.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस एक तणावपूर्ण दृश्य शूट करत होते आणि प्रियंका निकला कारच्या बाहेर काढताना पाहायला मिळाले. यावेळी प्रियंका या दरम्यान अपशब्द वापरताना दिसली.
निक कॅबचा दरवाजा खोलतो आणि बाहेर पडताना दिसला. जिम स्ट्रॉसे लिखित, दिग्दर्शित हा चित्रपट सोफी क्रमरच्या कादंबरीवर आधारीत जर्मन भाषेतील चित्रपट ‘एसएमएस फर डिच’चा इंग्रजी रिमेक आहे. या चित्रपटात सैम हेघनदेखील आहे.
निक आणि प्रियंकाची जोडीला म्युझिक व्हिडीओनंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशात हा चित्रपट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.
प्रियंका चोप्राने निक जोनससोबत 1 डिसेंबर, 2018 साली लग्न केले होते. 2 डिसेंबर, 2018 ला प्रियंका आणि निकने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते. याशिवाय रिसेप्शन पार्टीसोबत इव्हेंटचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
नुकतेच निक आणि प्रियंकाच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अशात दोघे सोशल मीडियावर एकमेकांना लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसले. निक अमेरिकन म्युझिशियन आहे.
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती द व्हाइट टाइगर आणि वी कॅन बी हिरोजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे.