बिग बॉस १३ ची फायनलिस्ट राहिलेली रश्मी देसाई अभिनयासोबत आपल्या खास अंदाजासाठी चांगलीच ओळखली जाते. रश्मी देसाई ऑनस्क्रीन तर लोकांना आपल्या अदाकारीने घायाळ करतेच पण सोशल मीडियावरही तिचे फोटो पाहून लोक अवाक् होतात.
(Image Credit : Instagram@RashamiDesai)
रश्मीने नुकतेच काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंवर तिचे फॅन्स तर कमेंट करतच आहेत सोबतच अनेक टीव्ही सेलिब्रिटीही तिचं कौतुक करत आहेत. नव्या फोटोशूटमध्ये रश्मी पिंक कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.
रश्मीचा हा बोल्ड अंदाज अनेकांना पसंत पडला असून अनेकजण तिच्या फोटोंवर भरभरून कमेंट करत आहेत. रश्मीला इन्स्टाग्रामवर ३.८ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. यावरून लोक तिच्यावर किती प्रेम करतात हे दिसून येतं.