Bollywood News : तो तुम्हारी फट जाएगी | ट्रोल करणाऱ्यांना कंगनाचं चोख उत्तर

220

आपल्या बिकिनीवरील फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना कंगना राणौतने चोख उत्तर दिले आहे.

कंगनाने, तिला सनातन धर्माची शिकवण देणाऱ्यांना उत्तर देताना लिहिले आहे, ‘काही लोक माझा बिकिनी पिक्चर पाहून मला धर्म आणि सनातनचे लेक्चर देत आहेत.

जर कधी मां भैरवी केस खुले करून, निर्वस्त्र, रक्त पिणाऱ्या रुपात समोर आली तर तुमचे काय होईल? तुमची तर फाटेलच आणि स्वतःला भक्त म्हणवता?

धर्माच्या मार्गावर चाला, त्याचे ठेकेदार बनू नका…. जय श्री राम.’ याच बरोबर तिने आपला आणखी एक फोटोही शेअर केला आहे.

कंगनाने बुधवारी सकाळीच मेक्सिकोच्या बीचवरील आपला बिकिनीवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तिच्या या फोटोवरून सोशल मीडियावर बरेच लोक रिएक्शन्स देत होते.

 

कुछ लोग मेरी बिकिनी पिक्चर देखकर मुझे धर्म और सनातन का लेक्चर दे रहे हैं, अगर कभी माँ भैरवी बाल खोल, वस्त्रहीन, ख़ून पीने वाली छवि लेकर सामने आ जाए तो तुम्हारा क्या होगा? तुम्हारी तो फट जाएगी और ख़ुद को भक्त कहते हो? धर्म पे चलो उसके ठेकेदार मत बनो…. जय श्री राम 🙏
pic.twitter.com/AIyNrSiTTT
— Kangana Ranaut (@KanganaTeam)
December 23, 2020

मेक्सिकोच्या बिच वरील आपला हा जुना फोटो शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘गुड मॉर्निंग मित्रांनो. मी माझ्या आयुष्यात ज्या ठिकाणांना भेट दिली आहे, त्यातील एक सुंदर ठिकाण मेक्सिको आहे.

हे अत्यंत सुंदर पण अनप्रेडिक्टेबल ठिकाण आहे. मेक्सिकोच्याच तुलुम आयलँडवरून माझा एक फोटो.’ राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरून चर्चेत राहणारी कंगना रणौत सध्या शेतकरी आंदोलनावरून चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी, शेतकरी आंदोलनासंदर्भात एक ट्विट करत कंनाना म्हणाली होती, की काही लोक याचा फायदा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

या शिवाय एका ट्विटमध्ये तिने पंजाबच्या एका वृद्ध महिलेला शाहीन बागची आजी असल्याचा उल्लेख केला होता. हे ट्विट तिने नंतर डिलिटही केले होते.

मात्र, यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या ट्विटवरून तिला दोन कायदेशीर नोटिसाही मिळाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here