‘इझी लोन’ ॲपच्या माध्यमातून अभिषेकने कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम अधिक होती.
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील लेखक अभिषेक मकवाना यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले.
त्यावेळी त्यांच्या हाती सुसाईड नोट सापडली होती. आपण आर्थिक परिस्थितीचा सामना करत असल्याचे त्यांने नोटमध्ये लिहिले आहे. अभिषेक यांना सतत कोणाचे तरी फोनवरून धमक्या मिळत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
सायबर फसवणुकीचा आणि ब्लॅकमेलचा शिकार झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अभिषेकने कर्ज घेतले होते.त्यासाठी त्याला वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन येत होते. पैसे फेडण्यासाठी त्याच्यावर दबाव निर्माण केला जात होता.
भावाचा मेल तपासून पाहिल्यानंतर त्याला पैशासाठी वेगवेगळे फोन येत होते. ‘इझी लोन’ ॲपच्या माध्यमातून अभिषेकने कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम अधिक होती.
अभिषेकने ज्या ॲपद्वारे कर्ज घेतले होते, ते ॲप ऑनलाईन सायबर घोटाळ्यात सामील असल्याचे अभिषेक यांच्या भावाने सांगितले. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.