Bollywood News | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनानं निधन

189

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या भटनागरचं सोमवारी सकाळी निधन झालं आहे. रिपोर्ट्सनुसार, दिव्या गेल्या काही दिवसांपासून दिव्याची प्रकृती गंभीर असून ती झुंज देत होती.

त्यानंतर सोमवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. ती 34 वर्षांची होती. दिव्याला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर तिला गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दिव्या भटनागर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘गुलाबो’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहचली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिव्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर न्युमोनिया झाला होता.

त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली. तिचा ऑक्सिजन लेव्हलही कमी होत गेली होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. व्हेंटिलेटरवर गेल्या अनेक दिवसांपासून ती झुंज देत होती. अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली आहे.

रात्री अचानक 2 वाजता तिची प्रकृती आणखी खालावली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर 3 वाजता डॉक्टरांनी दिव्याचं निधन झालं असल्याचं जाहीर केलं.

दिव्या भटनागरचा मित्र युवराज रघुवंशीने अभिनेत्रीच्या निधनाचं वृत्त दिलं. स्पॉटबॉयशी बातचित दरम्यान, युवराजने सांगितलं की, ‘दिव्याचं निधन पहाटे 3 वाजता झालं आहे. दिव्याला 7 हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.

 

दिव्याची मैत्रीण आणि अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहित दिव्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने लिहिलं आहे की, “जेव्हा कोणीच कोणासोबत नव्हतं तेव्हा केवळ तूच असायचीस.

दिवु तूच माझी होतीस, जिच्यावर मी रागावू शकत होते, रुसू शकत होते, माझ्या मनातल्या गोष्टी सांगू शकत होते. मला माहित आहे की, आयुष्यात तू खूप अडचणींचा सामना केलास.

परंतु, आता मला माहिती आहे की, तू एका चांगल्या ठिकाणी आहे, जिथे दुःख, वेदना, खोटं यांसारखं काहीच नाहीये. तू सदैव स्मरणात राहशील दिवू. आणि तुलादेखील माहित आहे की, तुझ्यावर मी प्रेम करते आणि तुझी काळजी करत होते.

मोठी तू होतीस, पण लहानही मुलगीही तूच होतीस. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. जिथे कुठे आहेस तिथे आनंदी राहा. तू खूप लवकर निघून गेली मैत्रिणी.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here