विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह आढळला | दोघांनीही आत्महत्या केल्याचा संशय

191

नगर तालुक्यातील दरेवाडी येथील एका विहिरीत तरुण तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

शनिवारी पहाटे तरुणीचा तर दुपारी चार वाजता याच विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. या दोघांनीही आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अजय सुरेश बडेकर ( वय 23 ) व मानसी भीमा पाचारे ( वय 22 दोघेही राहणार दरेवाडी ) असे मयत तरुणीचे नाव आहे.

शनिवारी पहाटे दरेवाडी येथील विहिरीत मानसी या तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला होता. याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या पथकाने मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.

दरम्यान मयत तरुण-तरुणी एकाच दिवशी गावातून गायब असल्याने मुलीच्या नातेवाईकांनी तरुण अजय याच्यावर संशय व्यक्त करत अजय बडेकर याला अटक करण्याची मागणी केली.

त्यानंतर तरुणीचा मृतदेह ज्या विहिरीत आढळून आला त्याच विहिरीच्या काठावर एक टी-शर्ट आणि पुरुषाच्या चपला आढळून आल्या. त्यामुळे मानसी सोबतच अजय याने देखील आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी कॅमेर्‍याच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेतला त्यानंतर दहा तासांनी विहिरीत अजयचा देखील मृतदेह आढळून आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here