नवी दिल्ली : BBC च्या एशियन नेटवर्कच्या एका रेडिओ शो मध्ये फोन इन कार्यक्रमात एका कॉलरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले. हा संतापजनक प्रकार BBC Asian Network’s Big Debate नावाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला.
एशियन नेटवर्क या बीबीसीच्या चॅनेलवर बिग डिबेट (BBC Big Debate) नावाचा कार्यक्रम घेतला जातो. एखाद्या विषयावर नागरिकांना त्यांचे विचार मांडायचे व्यासपीठ यातून दिलं जाते.
ब्रिटनमध्ये हा रेडिओ शो चालतो आणि त्याचं वेबसाइटवरदेखील प्रसारण होते. या शोमध्ये एका कॉलरने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांच्याबद्दल वाईट शब्द वापरले.
या रेडिओ शोचा आणि लिंक ट्विटरवर (BBC Twitter Handle) शेअर झाल्यानंतर अनेक नागरिकांनी ती पाहिली आणि त्याबद्दल आक्षेप नोंदवला.
या कॉलरने वापरलेल्या भाषेवर संताप व्यक्त करण्यात आला. अशा प्रकारचं वक्तव्य रेडिओवर प्रसारण कसे करू शकतात. या शोच्या अँकरने याविषयी काही आक्षेप कसा नाही नोंदवला, तिने हस्तक्षेप करून कॉलरला थांबवायला हवे होते. अशा अर्थाच्या कमेंट्स ट्विटर यूजर्सनी नोंदवल्या आहेत.
शोच्या होस्टने तातडीने संभाषण परत मूळ विषयाकडे वळविले, परंतु ही टिप्पणी हजारो श्रोत्यांपर्यंत पोचल्यामुळे खूप उशीर झाला होता.
काही जणांनी या प्रकारच्या निंदनीय भाषेबद्दल BBC ने माफी मागावी, अशी मागणीही केली आहे. या रेडिओ शोमधून कॉलरची आक्षेपार्ह कमेंट वगळण्यात आलेली नाही.
हा वादग्रस्त शो बीबीसी वेबसाइटवरही उपलब्ध आहे. शोच्या निर्मात्यांनी ऑडिओ अन्य श्रोतांसाठी अजूनही उपलब्ध ठेवण्याच्या निर्णयाने भारतातील अनेकांना त्रास झाला, त्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे.
यामुळे ट्विटरवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून # बोयकोट बीबीसी आज भारतातील ८००,००० हून अधिक ट्विटसह अव्वल ट्रेंड बनला आहे. # बॅनबीबीसी सध्या २५००० हून अधिक ट्विटसह दुसर्या क्रमांकावर आहे.
ब्रिटनमधल्या शीख आणि भारतीयांविरोघात होणाऱ्या वांशिक भेदभावाबद्दल चर्चा करणारा विषय या डिबेट शो मध्ये घेण्यात आला होता.
26 जानेवारीला दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. त्यानंतर हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा झाला.
चर्चेता सूर दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर घसरला आणि त्याच दरम्यान एका कॉलरने पंतप्रधानांबद्दल आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले आहेत, त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातोय.