#BoycottKareenaKhan सध्या ट्विटरवर ट्रेंड | ‘सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्री हवी’ सोशल मिडीयावर मागणी !

421
#BoycottKareenaKhan is trending on Twitter.

मुंबईः ‘#BoycottKareenaKhan’ सध्या ट्विटरवर ट्रेंड करीत आहे. अभिनेत्री करिना कपूर एका चित्रपटात ‘सीतामाता’ च्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजल्यावर सोशल मिडीयावर करीना कपूर खान विरुद्ध रान पेटले आहे.

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान सध्या चर्चेत आहे. ट्विटरवर # बॉयकोटकरिना खान ट्रेंड करत आहे. यामागील कारण म्हणजे ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित सिनेमात करीना माता सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

नेटिझन्सनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. तर # बॉयकोटकरिना खान ट्विटरवर ट्रेंड करत आहे. एकूण सोशल मिडीयावरील चित्र पाहता ‘#BoycottKareenaKhan’ होणार आहे.

कारण करीना कपूर खानने या चित्रपटासाठी मानधन म्हणून 12 कोटींची मागणी केली. बॉलिवूडचा बहिष्कार आणि करीना कपूर खान याच्या बहिष्काराची मागणी सोशल मीडियावर जोरदार जोरात सुरू आहे.

 boycott kareena kapoor khan is trending on twitter

आगामी ‘बिग बजेट’ रामायण चित्रपटाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. करीना कपूर खानला ‘सीता माता’ ची भूमिका साकारण्यासाठी सांगितले गेले होते.

या भूमिकेसाठी तिने 12 कोटींची मागणी केली असल्याचे शुक्रवारी समजले. नेटिझन्स आता सोशल मीडियावर’#BoycottKareenaKhan’ असे म्हणत नेटकरी संतापले आहेत, अजून सिनेमा सुरु झाला नाही, पण त्याआधी ‘#BoycottKareenaKhan’ ट्रेंड करून बोजवारा उडविला आहे.

SUGGESTED NEWS : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here