मुंबई : कोरोना काळात चित्रपटगृहे बंद असल्याने वेब सीरिजना प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. आता चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतरही वेब सीरिजची क्रेज कायम आहे.
आता नवीन रिलीज झालेले तांडव वेब सिरिज सध्या चर्चेत आली आहे. यामुळे सोशल मीडियावर तांडव सुरू झाले आहे. वेबसिरीज आणि वाद आता नवीन राहिले नाहीत.
अभिनेता सैफ अली खान स्टारर आणि जफर अली अब्बास दिग्दर्शित ‘तांडव’ वेब सीरिजमुळे सध्या सोशल मीडियात वादंग निर्माण झाला आहे. ही एक राजकीय वेब सीरिज आहे.
जी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलिज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या वेब सीरिजवरून चर्चा जोर धरू लागली असून, ट्विटरवर #BoycottTandav ट्रेंड झाला आहे.
कोणत्या मुद्यावरून तांडव वादात आले
वेब सीरिजच्या पहिल्या भागात जिशान अय्युब देवादी देव शिव शंकराच्या वेशभूषेत दिसत आहे. ते विद्यापिठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना, तुम्हाला कोणापासून मुक्ती पाहिजे.
या व्यासपीठावर एक पात्र येतं आणि म्हणते, प्रभू काही तरी करा. रामजींचे फॉलोअर्स सोशल मीडियावर वाढतच चालले आहेत. मला वाटते की, आपल्याला कोणती तरी नवी रणनीती आखली पाहिजे.
यावर शिव शंकराच्या रूपात असलेले जीशान अय्यूब म्हणतात की, काय करू मी फोटो बदलू का? यावर व्यासपीठाचे संचालन करणारे पात्र म्हणते की, भोलेनाथ तुम्ही तर खूपच भोळे आहात.
सीरिजच्या या दृष्यावरून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या दृष्यावरून सोशल मीडियावर यूजर्स नापसंती जाहीर करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, या दृष्यामध्ये हिंदू धर्माला चूकीच्या पध्दतीने दर्शवण्यात आले आहे.
ज्यामुळे हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचत आहे. अनेक लोकांकडून या दृष्याची तुलना व्हीएनयू VNU आणि JNU शी केली जात आहे.
सोशल मीडियावर ‘तांडव’ सीरिजला जोरात ट्रोल केले जात आहे. तर तांडवच्या निर्मात्यांना माफी मागण्यासाठी सांगितले जात आहे. ही वादग्रस्त क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सीरिजच्या निर्मात्यांसोबतच जीशन अयूबलाही ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावरील अनेक लोकांचे म्हणणे आहे की, चित्रपट उद्योगातील काही लोकांकडून जाणुनबुजून हिंदूंना आणि हिंदू धर्माला लक्ष्य केले जात आहे.
या वेब सिरिजचा ट्रेलर रिलिज होताच, वादंगातच या वेब सिरिजला पसंतही केले जात आहे. ‘तांडव’ मध्ये डिंम्पल कपाडियाने चांगला अभिनय केला आहे.
त्यामुळे त्यांचा डिजिटल मधील डेब्यूही यशस्वी ठरल्याच बोललं जात आहे. या सिरिजमध्ये सैफ अली खान पेक्षाही डिम्पल यांच्या अभिनयाला पसंत केले जात आहे.