पुणे: कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
राजीव सातव यांना न्यूमोनियाक झाला आहे. त्यामुळे, त्यांची प्रकृती खालावली आहे. त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Congress MP Rajiv Satav’s Health Deteriorated Again)
कॉंग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना कोरोनाची लागण देखील झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती.
त्यानंतर आता त्यांची तब्येत पुन्हा खालावली असल्याचे वृत्त आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर सातव यांनी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना 25 एप्रिल रोजी अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तर काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
दरम्यान न्यूमोनियामुळे राजीव सातव यांना आता पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. कोरोना इन्फेक्शनमुळे सातव यांना खूप थकवा जाणवत होता. त्यांची प्रकृती बिघडल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.
राजीव सातव तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी जहांगीर हॉस्पिटलला भेट दिली होती आणि डॉक्टरांशी प्रकृतीविषयी चर्चा केली होती. त्यानंतर आपली प्रकृती स्थिर असल्याचे आणि कोरोना संसर्गावर मात करतील असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला आहे.
19 एप्रिलपासून राजीव सातव यांची तब्येत बरी नव्हती. कोविडची लक्षणे दिसत होती. तर त्यांनी 21 एप्रिल रोजी कोरोनाची चाचणी केली. 22 एप्रिल रोजी हा अहवाल पोजीतीव्ह आला. त्यानंतर त्यांनी त्याच्या संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी असे आवाहन ट्वीट करून केले होते.