तब्बल 8 महिने दीराकडून भावजयीचं लैंगिक शोषण | भावाकडे केली धक्कादायक मागणी

252

भोपाळ : दीर- भावजयच्या नाते अत्यंत पवित्र मानले जाते. भावजय आईसमान मानली जाते. पण समाजात काही असे नराधम असतात कि पवित्र नाते कलंकित होते.

आरोपी दीराने आपल्या भावजयीवर गेल्या 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केले आहेत. नराधम दीर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने भावजयीशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं आपल्या भावाला सांगितलं.

तिच्याशी मला लग्न करायचं आहे, त्यामुळे तू तिला सोडून दे, असे या आरोपी दीराने आपल्या भावाला म्हटले, यावरून दोन्ही भावांत कडाक्याची भांडणं झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं.

संबंधित घटना मध्यप्रदेशातील भोपाळ येथील आहे. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर, संबंधित महिलेनं धक्कादायक खुलासा केला आहे.

गेल्या 8 महिन्यांपासून आरोपी दीराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं तिने म्हटलं आहे. तसेच अत्याचारानंतर घटनेची वाच्यता कुठेही केली तर बदनामी करण्याची धमकीही आरोपी दीराने दिली होती.

आपल्या तक्रारीत दिराची धमकी, घरच्या व नवर्याच्या बदनामीला भिऊन गप्प बसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी अभिषेकवर लैंगिक अत्याचार आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिला टीटी नगर परिसरात राहत असून त्यांचे मुळ गाव पन्ना आहे. टीटी नगर भागात पीडितेच्या पतीचे दुकान आहे.

पीडिताने पोलिसांना सांगितलं की, लॉकडाऊनच्या काळात पीडित महिला आपला पती आणि मुलांसोबत पन्ना येथे मुळ गावी गेले होते. लॉकडाऊन असल्यामुळे पुढील काही महिने त्यांना तिथे गावातच राहावं लागले.

दरम्यान मोठ्या सासऱ्यांचा मुलगा अभिषेक यांने पीडितेला शेतात पकडलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. विरोध केल्यानंतर आरोपीने तिला बदनाम करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपीने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला आहे. पण ऑगस्टमध्ये लॉकडाऊन उठल्यानंतर पीडित महिला आपल्या पती आणि मुलांसोबत परत भोपाळला आली, पण बदनामीच्या भितीने तिने कोणाला काहीही सांगितलं नाही.

त्यानंतरही आरोपीने भोपळला येऊन पतीच्या अनुपस्थितीत पीडितेवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले आहेत. प्रत्येक वेळी आरोपी दीराने तिला बदनामीची धमकी दिली.

24 जानेवारीलाही आरोपी अभिषेक पुन्हा भोपाळला आला होता. यावेळी पीडित महिला तिच्या पतीसोबत दुकानात काम करत होती.

आरोपी दुकानात आला आणि त्याने पीडितेच्या पतीशी भाडणं केलं आणि म्हणाला मी तिला माझ्यासोबत ठेवणार आहे. त्यानंतर दोन्ही भावांची कडाक्याची भांडणं झाली. या भांडणानंतर आरोपी तेथून निघून गेला.

तेव्हा पीडितेनं तिच्यासोबत घडलेल्या लैगिंक अत्याचाराची कहाणी तिच्या पतिला सांगितली. त्यानंतर रात्री उशीरा पोलीस ठाण्यात जावून पीडित दाम्पत्याने आरोपी दीराविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here