Budget2021 बजेट देशासाठी नाही तर निवडणुकांसाठी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

183

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना ‘बजेट देशासाठी नाही तर निवडणुकांसाठी मांडला आहे’ अशी मार्मिक टीका केली आहे. 

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यंमत्री ठाकरे यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अधिक माहिती घेऊनच यावर सविस्तर भाष्य कारेन असं सांगून त्यांनी या अर्थसंकल्पावर अधिक बोलणे टाळले.

यंदाच्या अर्थसंकल्पात पश्चिम बंगाल,आसाम, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या राज्यांसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत.

देशातील सर्वच विरोधी पक्षांनी केला आहे.महाराष्ट्रासाठी नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठी तरतूद वगळता कोणतीही भरीव तरतूद नसल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.

आता यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भर पडली असून उद्धव ठाकरे आता काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here