बंटी साहेब आम्ही शेतकऱ्याची पोर आहोत, तुम्ही आम्हाला नका शिकवू | चंद्रकांत पाटील

226

कोल्हापूर : दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात पडणार नाही. पंजाब सोडल्यास देशातील  शेतकरी या कायद्याबाबत समाधानी आहे.

प्रत्येक पक्षाचा नेता एकमेकाला भेटतो, एकमेकांची  कामे करुन घेतात. परंतू वर्षभरापासून राज्यातील राजकारण बदलले आहे. एकमेकाला दुष्मण समजू लागले आहेत. ही राज्याची संस्कृती नव्हती.

महादेव जानकर यांचे शरद पवार यांच्याकडे काहीतरी काम असेल किंवा पवारांनी त्यांना चहा पिण्यासाठी बोलावले असेल. कोणी ही कोणाला भेटू शकतो.

मीही त्यांना भेटेन. त्यात विशेष काही नाही, असे शरद पवार आणि जाणकर यांच्या भेटीवर आ. पाटील यांनी टिप्पणी केली. जानकर व पवार भेट हि अनौपचारिक भेट होती, कोणाला विशेष वाटली तर त्याला आम्ही काय करणार?

दरम्यान या कायद्यात काही बदल करण्याची सुचना असल्यास ते बदल करण्यात येतील याचबरोबर शेतकरी जोखडातून मुक्त होणार असल्याने या आंदोलनामुळे भाजपचा कसलाही राजकीय तोटा होणार नाही, उलट फायदाच होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी  (दि.०८) पत्रकार परिषदेत दिली.

याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. कोणीही कोठेही बोललावे आणि आम्ही चर्चा करावी असे होणार नाही. अशा वेळी चर्चा होईलच असे नाही.

एखाद्या त्रयस्थ संस्थेमार्फत कायद्याबाबत विरोधकांशी आमने-सामने कुठेही चर्चा करण्यास तयार आहोत. बंद पुकारला की ९० टक्के लोक स्वत:हूनच व्यवसाय बंद करतात. कोण कशाला वाकडे घेईल?

बंदमध्ये बळजबरी होते, कोणीतरी दगड मारणार, टायर फोडणार त्यापेक्षा एक दिवस घरात बसलेले बरे म्हणून लोक घरी बसले. हेच आजच्या बंदमध्ये झाले आहे. बंद यशस्वी झाला असे म्हणण्यास काही अर्थ नाही.

आम्ही बांधावरच; आम्हाला शिकवू नका

शेतकऱ्यांच्या बांधावर जावून बोलून दाखवा, असे सतेज पाटील म्हणाले, यावर आ. पाटील म्हणाले, बंटी साहेब हे कोणाला सांगताय. आम्ही शेतकऱ्याची पोर आहोत. तुम्ही आम्हाला नका शिकवू.

बांधावर नाही तर शिवारात शेतकरी त्यांचे स्वागत करत आहे. बंटी साहेब तुमचं ते हवाई राजकारण आहे. त्यात हे बसत नाही. पण आम्ही शेतकऱ्याला बांधावरच भेटत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here