CAA अधिसूचना जारी | आता बिगर मुस्लिम शरणार्थींना भारताचे नागरिकत्व मिळणार !

414
CAA Notification Issued | Now non-Muslim refugees will get the citizenship of India!

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA) वाद असतानाचं आता नवीन अधिसूचना जारी केली आहे.

यानुसार आता अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या किंवा येणाऱ्या बिगर मुस्लिम (हिंदू, शीख, जैन व बौद्ध) शरणार्थींकडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

केंद्राच्या सीएए कायद्याला देशभरातून मोठा विरोध करण्यात आला होता. मुस्लिम संघटना, एनजीओ आणि भारतातील विरोधी पक्षांनी हा कायदा मुस्लिमांसोबत भेदभाव करणारा असल्याचे म्हणत विरोध केला होता.

या कायद्याविरोधात देशभरात आंदोलनही झाले होते. दिल्लीतील शाहीन बागमध्ये बराच काळ आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या आडून अनेक गोष्टी घडत होत्या, त्याचीही खूप चर्चा झाली होती.

अधिसूचनेत गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ, हरयाणा आणि पंजाबमधील 13 जिल्ह्यात राहणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. यात हिंदू, शीख, जैन, बौद्ध यांच्यासारख्या बिगर मुस्लिम नागरिकांना नागरिकत्वासाठी अर्ज करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अद्याप नव्या सीएए कायद्यांतर्गत नियम तयार नाहीत. सीएए कायद्याच्या माध्यमातून मोदी सरकारने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद केली होती.

त्यामुळे नागरिकत्वासाठी आधीपासून असलेल्या नियमांतर्गतच नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. नवीन आदेशानुसार CAA कायदा लागू झाल्याने अनेक संघटनांनी व परदेशात बिगर हिंदूंनी आनंद साजरा करून या कायद्याचे स्वागत केले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरिकत्व कायद्या 1955 आणि 2009 मध्ये तयार केलेल्या कायद्यांतर्गत नियमानुसार आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, भारतीय नागरिकत्वासाठी जे लोक गुजरातमधील मोरबी, राजकोट, पाटन, वडोदरा जिल्ह्यात राहतात त्यांना अर्ज करता येणार आहेत.

यासोबतच छत्तीसगढमधील दुर्ग, बलौदाबाजार आणि राजस्थानमधील जालौर, उदयपूर, पाली, बाडमेर आणि सिरोही इथले लोक नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतील. याशिवाय हरियाणातीतल फरीदाबाद, पंजाबमधील जालंधरमध्ये राहणाऱे लोक यासाठी पात्र आहेत. (CAA Notification Issued | Now non-Muslim refugees will get the citizenship of India)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here