मंत्रिमंडळ विस्ताराची बैठक अचानक रद्द | कोणाला संधी मिळणार आणि कधी मंत्रिमंडळ विस्तार होणार याची चर्चा रंगली !

271
Cabinet expansion meeting abruptly canceled discussion on who will get opportunity and when cabinet will be expanded

आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित केलेली बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या संभाव्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठक आज (दि.6) संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी बोलावली होती. 

या बैठकीला अमित शहा, जे.पी. नड्डा, मुख्य मंत्री राजनाथ सिंह आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित राहणार होते, मात्र ही बैठक अचानक रद्द केली गेली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अचानक रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रकारचे कयास लावले जात आहेत. तरीही उद्या किंवा गुरुवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांना तातडीने दिल्ली येथे बोलविण्यात आले. मात्र, आजची बैठक रद्द झाल्याने मंत्रिमंडळातील फेरबदल पुन्हा लांबण्याची शक्यता वाढली असल्याचे काही नेत्यांनी खाजगीत बोलून दाखविले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दि.५ रोजी संध्याकाळी एक मोठी बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल, प्रह्लाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते.

मात्र मोदींनी काल रात्री गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे सचिव बीएल संतोष यांची भेट घेतली. यानंतर आजची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. 7 किंवा 8 जुलै रोजी मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येईल.

मंत्रिमंडळात चांगले काम न करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. सुमारे 22 नवीन नेत्यांना या विस्तारामध्ये संधी मिळेल अशी चर्चा आहे.

याव्यतिरिक्त काही मंत्र्यांची खातीही बदलली जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकार -२ ला दोन वर्षे झाली आहेत. पाच राज्यांमधील आगामी निवडणुका पाहता त्या त्या राज्यातील समाजातील नेत्यांना संधी देऊन राजकीय समीकरण जुळविले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here