दिल्लीत बोलावून नाना पटोले यांना कानपिचक्या, स्वबळाचा नारा अपरिपक्व

137
Nana Patole

नवी दिल्ली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, असे असतानाच काँग्रेस पक्षाकडून गेल्या काही दिवसांपासून सतत स्वबळाचा नारा दिला जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीरपणे स्वबळावर निवडणूक लढण्याचे छातीठोकपणे जाहीर सुद्धा केले होते. मात्र, आता नाना पटोलेंचा (Nana Patole) स्वबळाचा नारा फुसका बार ठरणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना (दि.25) दिल्लीत बोलावले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील (H. K. Patil), काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल (K.C.Venugopal) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यात दिल्लीत महत्वपूर्ण बैठक झाली.

या बैठकीत स्वबळाचा नारा, आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका, विधानसभा अध्यक्षांची निवड या बाबींवर चर्चा झाली.

ही बैठक पार पडल्यावर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी अत्यंत मोठे व महत्वाचे वक्तव्य केले आहे.

ही बैठक जवळपास पावणे दोन तास झाली. बैठकीनंतर एच. के. पाटील यांनी म्हटले, स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा अपरिपक्वपणाची ‘प्री मॅच्युअर’ आहे. आत्ता तो विषय महत्वाचा नाही.

त्यामुळे महाराष्ट्रात स्वबळाचा नारा देणारे नाना पटोले हे दिल्लीत तोंडघशी पडले आणि त्यांचा स्वबळाचा नारा हा सध्यातरी फुसका बार ठरल्याचे दिसत आहे.

बैठकीनंतर नाना पटोले काय म्हणाले?

नाना पटोले यांनी म्हटले की, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका बाबत चर्चा झाली. पक्षाची संघटना मजबूत करण्यावर चर्चा झाली.

प्रदेश संघटनेत किती उपाध्यक्षपद असावेत, सरचिटणीस किती असावेत यावर सुद्धा चर्चा झाली.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. विधानसभा अध्यक्षाची निवड याच अधिवेशनात झाली पाहिजे.

मोदी सरकार ईडीचा दूरुपयोग करत असल्याचे अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईतून दिसून येत आहे.

राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली असून या चर्चेत जे विषय होते, ते राज्याच्या दृष्टीने महत्वाचे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here