WhatsApp ला Signal पर्याय होऊ शकतो का? प्रायव्हसी महत्वाची असेल तर ‘पर्याय’ काय?

176

WhatsApp हे जगातील सर्वांत जास्त प्रसिद्धी पावलेले आणि यूजर फ्रेंडली मेसेजिंग ऍप आहे.

मात्र अलीकडे WhatsApp च्या नव्या बदलत्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे अनेक यूजर आता पर्यायांच्या शोधात आहेत.

या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार WhatsApp तुमचा डेटा हा फेसबुक आणि संबंधित कंपन्यांशी शेअर करणार आहे.

याचा WhatsApp युजर्सनी कडाडून विरोध करायला सुरुवात केली आहे.

कारण फेसबुक व WhatsApp यांच्या खरेदी विक्री व्यवहारात प्रायव्हसी हा मुद्दा होता.

तेव्हा WhatsApp ने फेसबुकला डेटा शेअर करणार नसल्याचे सांगितले होते.

आता बदलत्या धोरणानुसार WhatsApp युजर्सना प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारावी लागेल.

सद्य स्थितीत WhatsApp हे नवे अपडेट स्विकारण्याशिवाय युझरकडे दुसरा कोणताही अन्य ‘पर्याय’ उपलब्ध नाही.

एकतर हे अपडेट स्विकारा अथवा WhatsApp वापरणे सोडून द्या, असेच हे नवे धोरण सांगते.

आपल्या प्रायव्हसीबाबत सजग असणारे अनेक युझर सध्या Signal आणि Telegram सारख्या पर्यायी मेसेंजिंग ऍपकडे वळत आहेत.

यातील Signal हे एक असे ऍप आहे जे युझरकडून डेटाच्या नावावर फक्त लोकांचे कॉन्टॅक्ट नंबरच घेत असते.

या ऍपचा वापर जगातील अनेक पत्रकार, कार्यकर्ते, राजकारणी, वकील आणि सिक्यूरिटी एक्सपर्ट्स मोठ्या प्रमाणावर करतात.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी एक अ‍ॅप सुचवलं असून सिग्नल अ‍ॅप वापरा असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यानंतर सोशल मीडियावर सिग्नल ट्रेंडमध्ये आहे, म्हणूनच आपण आता या ऍपची काही खास वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

सिग्नल काय आहे?

Signal Messenger LLC हे ऍप मॉझिलासारख्या एका नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन सिग्नल फाऊंडेशनच्या अंतर्गत काम करीत आहे.

जेव्हा Acton ने कंपनी सोडून सिग्नलला 50 मिलीयन डॉलरला विकलं होते.

तेंव्हा या ऍपची निर्मिती करण्यात आली होती. एनक्रिप्टेड टेक्स्टींगच्या बाबतीत हे ऍप अत्यंत चांगले आहे.

सिग्नल फाऊंडेशन एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे.

तसेच कोणत्याही एका मोठ्या टेक कंपनीची यावर मालकी नाही.

ऍपमध्ये काय राहिल हे तुम्हाला असेल माहिती

या ऍपचा सोर्स कोड सार्वजनिक रित्या उपलब्ध आहे.

यामुळे जगभरातील सिक्यूरिटी एक्सपर्ट्स यामध्ये येणाऱ्या अडचणींचा चेक करु शकतात.

यामुळे या ऍपला बाकी ऍप्सच्या तुलनेत गतीने दुरुस्त केलं जाऊ शकते.

सारं काही एनक्रिप्टेड

सिग्नल प्रत्येक गोष्टीला एनक्रिप्ट करतं. यामध्ये आपला प्रोफाईल फोटो, व्हॉईस-व्हिडीओ कॉल्स, अटॅचमेन्ट्स, स्टिकर्स आणि लोकेशन या गोष्टी समाविष्ट आहेत.

चॅट्सचा बॅकप सुरक्षित

हे ऍप आपल्या मॅसेजचे असुरक्षित बॅकप्स क्लाऊड्सना पाठवत नाही.

क्लाऊडवर गुगल आणि व्हॉट्सएपसहित कुणीही हे बॅकप वाचू शकतो.

मात्र, Signal वर एनक्रिप्टेड डेटाबेसमध्ये बॅकप स्टोअर केला जातो.

सोबतच ऍप आपल्या सर्व्हरमध्ये आपल्या कॉन्टॅक्ट्सला देखील ठेवत नाही.

Signal चे सर्वांत जुने आणि उपयुक्त असे फिचर म्हणजे आपण मेसेज डिसअपीअर करु शकता.

हे फिचर अलिकडे व्हॉट्सएपवर आले आहे.

युझर्स यासाठी 10 सेंकदांपासून ते एका आठवड्यापर्यंतचा टाइमर सेट करु शकतात.

यामुळे आपले कोणतेही जुने चॅट आपोआप गायब होईल.

सोबतच वन-टाइम व्ह्यूएबल मीडिया आणि मेसेंजिंग रिक्वेस्ट्स सारखे अनेक फिचर्स व्हॉट्सएपवर मिळत नाहीत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here