धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण | कॉमेडियन मुनव्वर फारुकीला जामीन मंजूर

264

नवी दिल्ली: हिंदू देवी-देवतांविषयी अवमानकारक वक्तव्य करत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी मुनव्वर फारुकीला सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

जामीन याचिकेवरुन सुप्रीम कोर्टानं मध्यप्रदेश सरकारला एक नोटीस देखील जारी केली आहे. कॉमेडियन फारुकीवर आरोप आहे की, एका कार्यक्रमात त्याने धार्मिक भावना दुखावत चेष्टा केली होतीय या कार्यक्रमाचे आयोजन इंदौरच्या कॅफे मोनरोमध्ये एक जानेवारी रोजी करण्यात आलं होतं.

फेटाळली होती जामीन याचिका

कॉमेडियन फारुकी आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना इंदौर पोलिसांनी दोन फेब्रुवारीला अटक केली होती. याआधी मध्यप्रदेशच्या एका स्थानीक कोर्टानं पाच जानेवारीला जामीन अर्ज फेटाळला होता.

फारुकीच्या विरोधात भाजप महापौर मालिनी गौर यांचा मुलगा एकलव्य गौरनं तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं की, फारुकीनं नवीन वर्षानिमित्त इंदौरमध्ये आयोजित एका कॉमेडी शोदरम्यान हिंदू देव-देवतांबाबत आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here