उदगीर : येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या निवडणुकीत जगतज्योती महात्मा बसवेश्वर विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले.
या निवडणुकीपूर्वीच अध्यक्षपदासाठी सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे यांची तर बाबुराव हिप्पळगे, सुभाष धनुरे, रवी स्वामी, राचप्पा कपाळे कार्यकारणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली होती.
आज दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी उर्वरित कार्यकारणी सदस्यांची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये प्रमोद शेटकार उपाध्यक्ष, श्रीकांत बडीहवेली सचिव तर कार्यकारणी सदस्य म्हणून बाबुराव समगे, रवींद्र हसरगुंडे, सत्यप्रकाश डांगे, शिवकुमार उप्परबावडे, गुरुप्रसाद पांढरे, साईनाथ चिमेगावे, श्रीमती रेखाताई कानमंदे, शिवराज पाटील, सूर्यप्रकाश पाटील, सुशीलकुमार पटवारी, अनिल बागबंदे, राजकुमार हुडगे, श्रीमती उत्तराताई कलबुर्गे, संगमेश्वर महाजन सर्व उमेदवार बहूमताने विजयी झाले आहेत.
सर्व विजयी उमेदवारांचे वीरशैव लिंगायत समाजातून अभिनंदन होत आहे, तर चंदरअण्णा वैजापूरे यांनी वीरशैव लिंगायत समाज मतदार, हितचिंतक व समाज बांधवांचे आभार मानले आहेत.