चंद्रकांत पाटील हे बुड नसलेलं नेतृत्व आहे | मंत्री विजय वडेट्टीवार

199
Viajy Vadevattiwar-Chandrkant Patil

अहमदनगर : चंद्रकांत पाटील हे बुड नसलेलं नेतृत्व आहे. त्यांनी पुण्यात नाहीत तर कोल्हापूरमध्ये कुठं तरी स्थिर व्हावे.

चंद्रकांत दादा हे चंपारण्यातील पात्र जे फिरत राहत, अशी खोचक टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

“देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार आहे,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल (25 डिसेंबर) पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात केलं होतं.

त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता वडेट्टीवार यांनी हा टोला लगावला.

पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं?- उपमुख्यमंत्री अजित पवार

“मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं?” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

अजित पवार म्हणाले की, “एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी पुन्हा जाईन, मी पुन्हा येईन पण म्हणणार नाही, मी पुन्हा जाईन पण म्हणणार नाही…मी जनतेच्या सहकार्याने काम करत राहिन.

“चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, “मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं? पाच वर्षांसाठी तुम्हाला निवडून दिल आहे. वर्षाच्या आतच तुम्ही पुन्हा जाईन म्हणताय. असा टोला लगावला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here