घरघुती गॅस सिलेंडरवर ‘सबसिडी’ मिळतेय की नाही आताच तपासून पहा!

183
'Subsidy' on domestic gas cylinders

आपल्याला घरघुती गॅस सिलेंडरवर सबसिडी (LPG subsidy) मिळतेय की नाही. याबाबत तुमचा गोंधळ होत असेल तर, तुमचा गोंधळ एका मिनिटात दूर होऊ शकतो. तुम्हाला सबसिडी मिळतेय की, नाही, याबाबत एका मिनिटात माहिती मिळवता येऊ शकते.

  • Check through LPG ID च्या माध्यमातून तपासा

पेट्रोलियम कंपन्या काही दिवसांपासून LPGच्या दरांमध्ये वाढ करीत आहेत. LPG subsidy

यामुळे असंख्य ग्राहक याबाबतीत विचार करीत आहेत की, त्यांना सबसिडी मिळेल की नाही. सध्या सबसिडी मिळते की नाही? या प्रश्नांनी हैराण आहेत.

जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर, सबसिडी तपासण्याची पद्धत माहित करून घ्या. तुम्हाला दोन पद्धतीने तुम्हाला सबसिडी तपासता येईल.

  • इंडेन, भारत किंवा एचपी या कंपन्यांकडे दिलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या आधारे

  • गॅसपासबुक वरील LPG ID चा वापर करून

  • यामुळे तुमची सबसिडी थांबू शकते (Due to this, subsidy can be stopped)

LPG Cylinder price : जर तुम्हाला LPG ची सबसिडी मिळत नसेल, तर तुमचे LPG आधार क्रमांकाशी जोडला (LPG Aadhaar Linking) आहे का हे तपासून बघावे लागेल.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये सबसिडीची रक्कम वेगवेगळी आहे. ज्या लोकांचे उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त आहे. त्यांना LPG सबसिडी मिळत नाही.

अशी तपासा सबसिडीची रक्कम

  • ‘माय एलपीजी’च्या संकेत स्थळाला भेट द्या – क्लिक करा
  • या ठिकाणी 17 अंकी LPG ID नमूद करा
  • नोंदणीकृत संपर्क क्रमांक नमूद करा registered mobile number
  • कॅप्चा कोड भरा (captcha code)
  • तुमच्या क्रमांकावर OTP येईल
  • पुढील पानावर जाऊन आपला ईमेल आयडी नमूद करा
  • ईमेल आयडीवर आलेली एक्टिवेशन लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे अकाऊंट एक्टिवेट होईल.
  • यानंतर mylpg.in वर जाऊन लॉगइन करा
  • आधार क्रमांक एलपीजीला लिंक असेल याची खात्री करा
  • त्यानंतर View Cylinder Booking History/subsidy transferred या पर्यायावर क्लिक करा

याठिकाणी आपल्याला आपल्या खात्यावर सबसिडी ट्रान्सफर झाली आहे की नाही, हे तपासता येईल. जर सबसिडी जमा होत नसेल तर आधार गॅस कनेक्शन सोबत लिंक करा व बॅंकेत KYC केली की नाही तपासून पहा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here