औसा तालुक्यातील लिंबाळा दाऊ येथे दुपारी तीनच्या सुमारास उसाचे ट्रॅक्टर हे शिवारातून ऊस भरून कारखान्याकडे जात असताना लिंबाळा चौकात या ट्रॅक्टरखाली आसल्याने एका तेरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कृष्णा भानुदास शिंदे असे त्या मुलाचे नाव असून तो ऊस तोडण्यासाठी चालू ट्रॅक्टर वर चढत असताना त्याचा पाय घसरून ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.