कोविड लस आली म्हणून जीव भांड्यात पडला असला तरी नागरिकांनो सावध रहा.
कोरोना लसीकरणासाठी आम्ही नावनोंदणी करीत आहोत, तुमचे नाव आणि कुटुंबीयांची माहिती द्या असे फोन येऊ लागले आहेत.
आधार कार्ड, बँकखाते, पॅनकार्ड, एटीएम क्रमांक दिल्यानंतरच नावनोदंणी होईल. अशी बतावणी करून सायबर चोरट्यांकडून तुमची ऑनलाईन लुट करण्याचा डाव आखला जता आहे.
त्यामुळे अशा फोनकॉल्सला उत्तर न देता, फसवणूक टाळण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. कोरोना लसीकरण करण्यासाठी शासनाकडून स्थानिक महानगरपालिका, जिल्हा प्रशासनाकडून मोहिम राबविली जाणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या भूलथापांच्या आहारी जाउ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.राज्यातील काही शहरात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली आहे.
मात्र, तत्पुर्वीच सायबर चोरट्यांकडून नागरिकांना कोरोना लसीकरणाच्या नावाखाली जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी सायबर चोरट्यांकडून वेगेवेगळ्या माध्यमांचा वापर केला जता आहे.
विशेषतः नागकिरांना फोन करून आम्ही अमुक-तमूक बोलत आहेत. आपल्यासह कुटुंबातील सर्वांना कोरोना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी शासनाकडून आम्ही नावनोंदणी करीत आहोत.