आ देखे जरा किसमे कितना है | खासदार संजय राऊतांची ED च्या समन्सवरून टीका

184

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. PMC Bank घोट्याळ्याप्रकरणी हा समन्स देण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती समजत आहे.

२९ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे.

आ देखे जरा किसमे कितना है दम जमके रखना कदम मेरे साथीया, असं संजय राऊत यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.  

दरम्यान, ED ची नोटीस आल्याची कुठलीही माहिती नसल्याचे संजय खा. संजय राऊत यांनी म्हटले होते. नोटीस आल्यावर पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचेही राऊत यांनी म्हटलं होते.

pic.twitter.com/LAECXwg5UJ

— Sanjay Raut (@rautsanjay61) December 27, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here