लातूर जिल्ह्यात काळजी वाढली | जिल्ह्यात १४०४ नवे विक्रमी रूग्ण !

486
Jalna district shaken: 4 corona victims die in a single day

लातूर जिल्ह्यात शुक्रवारी (दि.९ एप्रिल) कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १४०४ वर पोहोचली. हा आकडा आजवरच्या उच्चांकी आकड्यांपैकी एक असून चार जणांचा कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला.

मृत्यूच्या आकड्याने देखील आठशेच्या जवळपास मजल मारली असून, एकंदर सर्व परिस्थिती पाहून चिंतेत भर पडली आहे.

शुक्रवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये ४३२ तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ९७२ असे मिळून १४०४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले.

आज आरटीपीसीआर एकूण टेस्ट २२०० तर रॅपिड अँटिजेन टेस्ट ३६५० झाल्या होत्या. यातून १४०४ रूग्ण पॉझिटिव्ह आले.

जिल्ह्यात आजवर ४० हजार ५३१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, यातील ३१ हजार ४१० रूग्ण उपचाराने बरे झाले आहेत.

सध्या रूग्णालयात २६८१ रूग्ण उपचार घेत असून, हा आकडा असाच वाढत राहिला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि पर्यायाने, कडक लॉकडाऊनची गरज भासेल, असे एकूण चित्र आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण होऊन ७९७ रूग्ण दगावले आहेत. शुक्रवारी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याने प्राण गमवावे लागले.

ही भीषण परिस्थिती दिवसेंदिवस गडद होत असून, सर्वांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य खात्याने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here